समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
याबाबत सविस्तर वृत्त असे की,उल्हासनगरच्या
१७ सेक्शन भागात राहणारे नारायण नागराणी यांच्या भावाचे दत्ता नावाच्या
व्यक्तीसोबत पैशांचे व्यवहार होते. या पैशांच्या देवाणघेवाणीवरुन नारायण यांचा भाऊ
हा बिंटु बारसमोर असताना त्याला दत्ता आणि अन्य २ ते ३ जणांनी मारहाण करण्यास
सुरुवात केली. यावेळी नारायण नागराणी हे भावाला वाचवायला मधे पडले असता नारायण आणि
त्यांच्या भावाला चाकूसमक्ष हत्याराने दुखापत करण्यात आली. या सगळ्यात नारायण आणि
त्यांचा भाऊ जखमी झाला.
हा सगळा प्रकार
याच भागातल्या काही रहिवाशांनी मोबाईलमध्ये चित्रित केला. याप्रकरणी मध्यवर्ती
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.