कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापुरात एक
धक्कादायक घटना घडली. एका तरुणीनं आत्महत्या केलीय. या तरुणीच्या आत्महत्येचं कारण
खळबळजनक आहे. डिपी ठेवला नाही म्हणून एका तरुणानं या मुलीला मारहाण केली होती.
त्यानंतर नैराश्य आलेल्या तरुणीनं गळफास घेत जीव दिलाय. या घटनेनं कोल्हापुरात एकच
खळबळ उडालीये. सविता खामकर असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. कोल्हापुरातील
आजरा तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलीला आजरा बस स्थानक
परिसरात मारहाण करण्यात आली होती. डीपी ठेवला नाही, म्हणून या तरुणीला मारहाण
करण्यात आल्याचं समोर आलंय. त्यानंतर निराश झालेल्या या तरुणीनं गळफास घेत
आत्महत्या केली. आत्महत्या करणारी ही तरुणी अल्पवयीन असल्याचीही माहिती समोर आली
आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन
मुलीनं केलेल्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या
अल्पवयीन मुली मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
किशोर सुरंगी या तरुणाविरोधात आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय.
किशोर सुरंगी
या तरुणानेच सविताला आजरा बस स्थानक परिसरात मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय.
डीपी ठेवला नाही, म्हणून किशोरने सविताला मारहाण केली होती, असं सांगितलं जातंय. त्यानंतर निराश झालेल्या सवितानं गळफास घेत आत्महत्या
केली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.