पुणे प्रतिनिधी:तुकाराम भांगले
वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक
२५ एप्रिल २०२२ रोजी युनिट ५ गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली
युनिटकडील सहा पोलीस निरीक्षक पी . एम . लोणारे व युनिटकडील अंमलदार , यांचेसह युनिट हद्दीत
पेट्रोलिंग करीत असताना बातमी मिळाली की पुणे - सासवड रोडवर फुरसुंगी ओव्हर
ब्रिजखाली फुरसुंगी , पुणे याठिकाणी काही संशयित इसम ते त्यांचेकडील
घातक हत्यारे जवळ बाळगुन थांबलेले आहेत व ते फुरसुंगी येथील एका मोबाईल दुकानातील
मोबाईल कॅश व इतर ऐवज लुटण्यासाठी जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली ,
त्याप्रमाणे युनिटकडील सपोनि प्रसाद लोणारे व त्यांचे टिमने पुणे
सासवड रोड ओव्हर ब्रीजजवळ सापळा लावुन एकुण ५ इसम पळुन जात असतांना ताब्यात घेतले
. सदर इसमांची नावे शिवराज उर्फ सुरज अर्जुन वाडेकर (वय २४ वर्षे ) रा. पवारवस्ती केशवनगर
,मुंढवा , पुणे ,संतोष राजु गायकवाड (वय .२६ वर्षे) रा. गायरानवस्ती
, केशवनगर, मुंढवा ,
पुणे दत्ता गणेश गायकवाड (वय.३४ वर्षे) रा. पवारवस्ती , केशवनगर, मुंढवा , पुणे ,अविनाश
उर्फ चार्ली सिद्राम जाधव (वय.२९ वर्षे) रा.पवारवस्ती, केशवनगर
मुंढवा ,पुणे लखन
सुभाष जाधव , (वय.३० वर्षे), रा. सर्वोदय
कॉलनी , केशवनगर ,मुंढवा पुणे असे असुन आरोपी शिवराज उर्फ
सुरज अर्जुन वाडेकर याचेवर एकुण ७ गुन्हे ,संतोष राजु
गायकवाड याचेवर एकुण ९ गुन्हे दत्ता गणेश गायकवाड याचेवर एकुण २ गुन्हे, अविनाश
उर्फ चार्ली सिद्राम जाधव याचेवर एकुण ०४ गुन्हे व सध्या तडीपार लखन सुभाष जाधव
याचेवर एकुण ०६ गुन्हे असे वेग - वेगळ्या पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत . सदर
इसमांकडुन एकुण २२,४६० / - रुपये किचा मुद्देमाल त्यामध्ये
दोन कोयते , एक कटावणी , दोन स्क्रु-
ड्रायव्हर , दोन बॅग , लाल मिरची पावडर
, नायलॉनची दोरी असे घातक शस्त्रे व इतर वस्तु साधने असा
मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे .
यातील
प्रत्येक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन प्रत्येकावर चोरी , जबरी चोरी , मारामारी असे गुन्हे दाखल आहेत व आरोपी नामे अविनाश उर्फ चार्ली सिद्राम
जाधव , वय २९ हा सध्या तडीपार आहे . सदर आरोपी यांचेविरुध्द
हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन आरोपी यांना न्यायालयात
हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडी मंजुर झालेली आहे . पुढील तपास युनिट कडील सपोनि
प्रसाद लोणारे हे करीत आहेत . सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ,
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक ,अपर पोलीस
आयुक्त , गुन्हे ,रामनाथ पोकळे ,
पोलीस उप - आयुक्त श्रीनिवास घाडगे , सहायक
पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत
पाटील , सहा . पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे , पोलीस अमंलदार , रमेश साबळे , दया
शेगर , अजय गायकवाड , चेतन चव्हाण ,
दिपक लांडगे , अश्रुबा मोराळे , दत्तात्रय ठोंबरे यांनी केलेली आहे.