मंचर प्रतिनिधी:
आदिवासी भागात गेल्या
तीन वर्षात १५ हजाराहून अधिक बालविवाह होतात ही मोठी शोकांतिका आहे त्यापैकी जेमतेम १०
टक्के म्हणजेच १५००च्या जवळपास बालविवाह रोखण्यात यश आल्याचे अहवालात नमूद केले
गेले आहे लहान वयात मुलांची लग्ने झाल्याने त्यांच्या आरोग्यावर,मानसिक विकासावर
आणि मानसिक विकासावर आणि आनंदी जीवनावर परिणाम
होतो.संपूर्ण समाजात मागासलेपणा येतो.जे शेवटी समाजाच्या प्रगतीत अडथळा ठरते यासाठी
कायद्यात लग्नाचे वयही निश्चित करण्यात आली आहेत.असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील
कुरकुंडी गावात उघडकीस आला आहे.याप्रकरणी पिडीत मुलीचा पती आणि मुलीच्या वडिलांवर
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,खेड
तालुक्यातील कुरकुंडी गावातील ठाकरवस्तीत राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १९
वर्षीय तरुणासोबत विवाह लावून देण्यात आला. या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह
पतीलादेखील हा विवाह चांगलाच महागात पडला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांत गुन्हा
दाखल झाला आहे. खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातील आदिवासी ठाकरवस्तीत राहणाऱ्या १७
वर्षीय मुलीचा विवाह गावातील १९ वर्षीय तरुणासोबत ११ महिन्यांपूर्वी लावून देण्यात
आला होता. दरम्यानच्या काळात अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिल्याने बाल
विवाहाचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी चाकण पोलिसांत बलात्कार, बाल विवाह कायदा, बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंध
कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालविवाहास प्रतिबंध असूनही
असे प्रकार होत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे.