पुणे प्रतिनिधी:तुकाराम भांगले
दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी फॅशन मेन्स वेअर या दुकानामध्ये अनोळखी इसम याने दुकानामध्ये कोयते घेऊन दुकानातील कुसुम नागरगोजे यांना मारहाण करून दुकानातील कपडे बळजबरीने चोरी करुन घेवुन गेले असल्याने चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं १३८/२०२२ भा.द.वि.स. कलम ३ ९ ४.३४ आर्म अॅक्ट ४ ( २५ ) प्रमाणे अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल आहे . दि .२१ एप्रिल २०२२ रोजी पोलीस उप निरीक्षक भरत गोसावी पोहवा / ५०६ सी.एम. गवारी पोलीस अंमलदार मुलुक ब नं १५ ९ ७ , मोहसिन आत्तार पो कॉ ब नं २१८४ असे पेट्रोलीग यांनी माहीती चिखली गावामध्ये फॅशन मेन्स वेअर दुकानात चोरी केलेले इसम ह वटटा स्किम निगडी येथे काळभोर गोठा येथे बसले आहे . अशी बातमी मिळाली असल्याने सदर बाबत मा . राजेंद्र निकळजे पोलीस निरीक्षक शस्त्र विरोधी पथक यांना कळविले असता त्यांनी सदर इमस यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाई करावी असे कळविले असता सदर इसम नामे १ ) अमन अर्जन वाघमारे वय १९ रा संजय हॉटेल जवळ विलारस नगर ओटा स्किम निगडी पुणे . २ ) हर्षल संतोष विधाते वय १८ रा काळभोर गोठया ओटा स्किम निगडी पुणे ३ ) प्रणव गौराना अर्जुन वय १८ रा बैध्द नगर ओटा स्किम निगडी पुणे , ४ ) किरण किसण चव्हाण वय १८ मिलीद नगर ओटा स्किम निगडी पुणे यांना ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषगांने चौकशी केली असता त्यांना गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याने सदर आरोपी यांचेकडुन गुन्हयामध्ये वापरलेली मोटर साकयल १ लोखंडी कोयता , कपडे , हे हस्तगत करून पुढील तपास कामी चिखली पोलीसांचे ताबेत देण्यात आले असुन पुढील तपास शस्त्र विरोधी पथकातील अधिकारी व अमलदार तसेच चिखली पोलीस करीत आहेत . सदरचे आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत . सदरची कारवाई पिंपरी - चिंचवडचे पोलीस आयुक्त शंकर शिंदे सो अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे सो , श्री काकासाहेब डोळे सो .पोलीस उप आयुक्त गुन्हे , सहा पोलीस उप आयुक्त प्रंशात अमृतकर सो सहा पोलीस उप आयुक्त पदमाकर घनवट सो , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे , बी . आर गोसावी पोलीस उप निरीक्षक , सहा पोलीस उप निरीक्षक शाम शिदें , लखनकुमार वाव्हळे , चंद्रकांत गवारी पो हवा , प्रितम बी वाघ पो हवा , नामदेव वडेकर पोहवा , वसिम शेख पो हवा प्रविण मुळुक पो शि मोहसिन आत्तार यांचे पथकाने केली आहे.