समर्थ भारत न्यूज नेटवर्क: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं होतं. यानंतर साईनाथ बाबर यांना पुणे शहराची सूत्र देण्यात आली. दरम्यान, वसंत मोरे यांनी मुंबईत जाऊन 'शिवतिर्थ'वर राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची भेटही घेतली. यानंतर पक्षातील वादळ शमल्याचं पाहायला मिळालं. वसंत मोरे यांनी मी मनसेतच असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम लावला. यानंतर त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांच्या दौऱ्यात वसंत मोरे गायब असल्याचं दिसतंय. मुंबई आणि ठाण्यातील सभांना हजेरी लावणारे वसंत मोरे राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर मात्र दौऱ्यात कोणालाही दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीने सध्या पुन्हा चर्चा रंगली आहे. राज ठाकरे आणि मोरे यांच्यात दुरावा निर्माण झाल्यापासून मोरे पक्षाला रामराम करणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. पक्षपदापासून दूर केल्यानंत...
समर्थ भारत माध्यम समूह