शिरूर प्रतिनिधी:
शिरूर
तालुक्यातील कोंढापुरी हद्दीत अपघाताचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, प्रवाशी
वाहतुक कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यावेळी कारचा टायर फुटला या अपघातात
दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदतीचा हात न देताच कार चालकाने टायर फुटलेला असतानाही कार
भरधाव वेगाने पळवल्याचे समोर आले आहे. यामध्ये टायर तुटलेल्या अवस्थेत कार चालकाने
तब्बल 5 ते 6 किलोमीटर कार चालवत
शिक्रापुरपर्यंत पळवली यावेळी धोकादायकरित्या कारच्या चाकाचा डिक्स मधून
आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नेमकं
काय घडलं
अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक
पुणे – नगर महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम असते. घटनेच्या
वेळीही रस्त्यावर मोठया संख्येने वाहने होती. याचवेळी प्रवाशी वाहतुक कार आणि
दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातानंतर कार चालकाने कारण थांबवताचा वेगानं
कारचालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघातग्रस्त कार वेगानं
चालविल्याने त्या कारचा टायर फुटून रस्त्याला घासतते गेली यावेळी त्यातून
मोठ्याप्रमाणात ठिणग्या बाहेर पडत होत्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर
व्हायरल झाला आहे. अपघातस्थळापासून पळ काढण्यासाठी कार चालकाने हे कृत्य समोर आले
आहे. या घटनेनंतर कार चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलीस आरोपीचा शोध
आहेत.
रस्त्यावर अपघात झाल्यावर अपघातस्थळावर मदत न करताच पळ काढणं हे चुकीचे असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केलं आहे. रस्त्यावर अपघात होताच असतात , मात्र या अपघातातही नागरिकांनी आपल्या माणुसकीचे दर्शन घडवणे आवश्यक आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक असल्याची भावना पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेतील आरोपीवर गुन्हा नोंद केला असून, त्याचा शोध घेण्याचं काम सुरु असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी दिली आहे.