पुणे प्रतिनिधी:
केस वाढल्याने शाळेत
येताना केस कापून ये, असे सांगितल्याने शाळकरी मुलांनी वर्गप्रमुख विद्यार्थ्याला बांबूने
बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली.
या प्रकरणी चार
अल्पवयीन शाळकरी मुलांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत
एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा १४
वर्षांचा मुलगा कोंढवा भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तो वर्गप्रमुख (मॉनीटर)
आहे. त्याने वर्गातील दोन मुलांना केस का कापले नाहीस, अशी विचारणा केली.
तसेच केस कापून न आल्यास वर्ग शिक्षकांकडे तक्रार करीन, असे त्याने
सांगितल्याने त्याच्या वर्गातील दोन मुले चिडली होती. त्यातून शाळकरी मुले आणि
त्यांच्या बरोबर असलेल्या दोन मुलांनी वर्ग प्रमुख विद्यार्थ्याला बांबू तसेच
पट्ट्याने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत वर्गप्रमुख विद्यार्थी जखमी झाला
आहे. या प्रक्ररणी मारहाण झालेल्या मुलाच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार
दिली.