Skip to main content

बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोरोना घोटाळा..!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:

कोरोना बाधित नसताना केवळ हेल्थ विमा पॉलिसीचे पैसे उकळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचे दर्शवण्यात आले. औरंगाबाद महापालिकेच्या चिकलठाणा मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला असून रुग्णाला येथून बनावट डिश्चार्ज कार्डदेखील मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे बोगस कार्ड तयार करून कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून  जणांनी विमा कंपनी कडून  लाख ६०  हजार रुपये उकळले. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घोटाळा कसा उघड झाला?

औरंगाबादेत लस न घेताच बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रीय झाली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता कोरोनाचे उपचार न घेताच बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कोटक जनरल इन्शुरन्समध्ये जहीर खान अजगर खान हे मुख्य व्यवस्थापक आहेत. कंपनीतील विम्यासाठी दाखल झालेल्या दाव्यांची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.  जून २०२१ १२  जानेवारी २०२२  दरम्यान ११ दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बुलेट हेल्थ केअर सर्व्हिसचे अधिकार केदारेश्वर अनिलराव सपकाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी तपासणी करताना मनपा हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर, चिकलठाणा येथे भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी आशिष बोरगे यांनी इंदल राजपूत, प्रवीण पवार, इम्रान शेख आणि गणेश कडू यांचे डिश्चार्ज कार्ड बनावट असल्याचे लिहून दिले. त्यांनी उपचार घेतलेले नाहीत, असेही स्पष्ट केले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

बनावट रुग्णांवर गुन्हे

सदर प्रकरणीएमआयडीसी सिडको पोलीस स्टेशनमध्ये  बनावट रुग्णांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात असित वाघ, अमोल रानसिंग, शिवाजी मुळे, शुभांगी राजपूत, किशनलाल गुर्जर, गणेश कडू, इंदल राजपूत, इम्रान मुश्ताक, प्रवीण पवार या आरोपींचा समावेश आहे. विमा कंपनीचे व्यवस्थापक जहीर खान यांनी पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान,  पैकी पाच जणांनीच प्रत्येकी ५४  हजार ते ६०  हजार रुपयांपर्यंत पॉलिसीची रक्कम उकळली आहे. हा आकडा चार लाख ६२  हजार रुपये होतो. उर्वरीत चौघांनी साठ हजार रुपयांचा दावा दाखल केला होता. मात्र अद्याप त्याची रक्कम उचललेली नाही.

रुग्णालय कर्मचाऱ्यांचं काय?

बनावट डिश्चार्ज कार्डवर पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र हे डिश्चार्ज कार्ड मेल्ट्रॉन सेंटरचेच आहे. त्यामुळे रुग्णालयाचे कर्मचारी या घोटाळ्यात सहभागी असू शकतात. त्यांचा शोध घेऊन कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच कोटक वगळता इतर विमा कंपन्यांमधून पैसे उकळण्यासाठीही असे बनावट डिश्चार्ज कार्ड करण्याची शक्यता असू शकते. त्याचा तपास कोण करणार, असा सवालही जनतेतून विचारला जात आहे.



 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

तीन गुन्ह्यांतील सराईत मंचर पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी आनंद नेटके : गुढी पाडव्यानिमित्त मंगळवारी (दि. ९) मंचर शहरातील बजरंग दलाचे वतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला होता. मिरवणुक बंदोबस्त चालु असताना रात्री ९ च्या सुमारास मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंचर पोलीस स्टेशन व खेड पोलीस स्टेशनचे गुन्हयातील फरारी सराईत आरोपी शुभम सुभाष तोत्रे (रा. पॅराडाईज सोसायटी, मंचर) हा मंचर येथील लक्ष्मीरोड येथे येणार आहे.  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक अरूण फुगे यांनी लागलीच मिळालेल्या बातमीचा आशय सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस हवालदार एस.एन. नाडेकर व मंचर पोलीस स्टेशन स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे, पोलीस अंमलदार अविनाश दळवी, पोलीस अंमलदार अजित पवार, पोलीस अंमलदार योगेश रोडे यांना सांगितल्याने सहा पोलीस निरीक्षक कांबळे व सोबतचे पोलीस स्टाफने लक्ष्मी रोड येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना रात्रौ ९.३० च्या सुमारास शुभम तोत्रे हा लक्ष्मी रोड येथे मिरवणुकीच्या गर्दीत दिसला. शुभम तोत्रे याला पोलीसांची चाहुल लागताच तो पळुन...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...