मुंबई प्रतिनिधी:
गुडीपाडव्याच्या दिवशी राज्यातील
जनतेला एक दिलादायक बातमी मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोकण्यात देशात आरोग्य
यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या दिवशी कोविडचे निर्बंध पुर्णपणे हटवले जाण्याची शक्यता
आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आपत्ती व्यवस्थापण कायदा
राज्यात लागू करण्यात आला होता. पण सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प प्रमाणात असल्याने
लावलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार
नाही. पण इतर देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मास्क सोशल
डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येत आहे.
गुडीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांना
खूशखबर मिळणार
महाराष्ट्रात १ एप्रिलपासून कोरोना निर्बंधातून मुक्ती होणार
पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात
चिंता
चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये सध्या
कोरोनाने पुन्हा डोकेवरती काढल्याने चिंता वाढली आहे. चीनच्या अनेक महत्त्वाच्या
शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक सार्वजनिक ठिकाणी लोकांची चाचणी
सुध्दा करण्यात येत आहे. चीनमध्ये अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे.
भारतात केंद्र सरकारने कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथील केले आहेत. पण, केंद्राने राज्यांना
महत्त्वाच्या सूचना देखील केल्या आहेत. मास्क आणि हात सातत्याने साबणाने धुतले
पाहिजेत. तसेच सॅनिटाईज सुध्दा करणं गरजेचं आहे. जरी निर्बंध शिथील झाले तरी काळजी
घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.