पुणे प्रतिनिधी:
शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण
दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी थोड्या थोड थोडक्या नव्हे तर तब्बल १०
घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत.
चाकण, आळंदी, दिघी यता परिसरात हा चोरीच प्रकार
घडलेत आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी ७ लाख ८० हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड
पोलीस, गुन्हे
शाखा युनिट ३ च्या वतीने ही कारवाई करण्यात
आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे असे अटक
करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या केलेल्या या कामगिरीचं नागरिकांनी
कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही वेशांतर
करून खंडणी मागणाऱ्याला रंगेहात पकडले होते. या घटनांमुळे पिंपरी पोलीस पुन्हा अलर्ट
मोडवर आल्याचे दिसून आले आहे.
अशी केली कारवाई
पिंपरी
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील एका महिन्यापासून चाकण, आळंदी, दिघी परिसरात घरफोड्या झाल्याच्या
अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या घटनांची दाखल घेत पिंपरी चिंचवड पोलीस, गुन्हे शाखा युनिट 3 ने तपास करण्यास सुरुवात केली.
तपास करता असताना या घरफोड्यांमध्ये सचिन काळे नावाच्या आरोपीचा समावेश असल्याची
माहिती पोलिसांना मिळाली. याबरोबच आरोपी सचिन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे
समोर आले. याच दरम्यान आरोपी सचिन हा घरफोडीच्या गुन्ह्याखाली येरवडा करागृहात
शिक्षा भोगत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत न्यायालयाच्या
परवानगी मिळवली. आरोपी सचिन काळेला ताब्यात घेतले. . त्याला ताब्यात घेतल्यानंतर
त्याच्याकडे चौकशी केली असता . त्याने दहा
घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल केली. तपासा दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ७ लाख ८०
हजार रुपयांचे दागिने जप्त केले
आहेत. आरोपी सचिन काळेवर चोरी घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. यामुळे
त्याला ताब्यात घेत नेमक्या कोणत्या परिसरात कधी घरफोडी केली. यावेळी त्यांच्या
सोबत आणखी कोण-कोण सहभागी होते याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.