समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांना आंदोनल सुरु आहे. मात्र कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आज संपणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही. कोर्टाने दिलेली मुदत संपली ती कारवाई करु असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
पुढे ते म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना दिलेली
मुदत आज संपणार आहे. मी आधीच सांगितलं होतं ३१ मार्चपर्यंत सगळ्यांना संधी द्या.
आता तशा प्रकारची संधी दिली आहे. उद्यापासून कठोर भूमिका घेतली जाणार आहे. वेळ
पडल्यास कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन भरती केली जाऊ शकते. बेस्ट, पीएमपीएलने इलेक्ट्रॉनिक आणि सीएनजी बसेस
कंत्राटवर घेतल्या आहेत. एका कंपनीने पीएमपीएलने चालवायला घेतल्या आहेत. त्याचा
खर्चही कमी होतो आणि प्रवाशांचा फायदा होत, असल्याचं
त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला आणि न्यायव्यवस्थेनं निकाल
दिला तर न्यायव्यवस्था सर्वोच्च असेल. त्यांनीही दिलेली मुदत संपली तर पुन्हा कठोर
कारवाई करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो, असंही
पवार यांनी म्हटलं आहे.