समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या मराठी कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाने गुजरातसह
महाराष्ट्रातही खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या ४८
तासांत या हत्याकांडाचा छडा लावला आहे. क्राईम ब्रांचने
संशयित विनोद गायकवाड याला अटक केली आहे. विनोदने पत्नी, दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची
हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक
तपास सुरु आहे.
काय आहे प्रकरण?
एकाच
घरातून पोलिसांनी चार कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले
होते. अहमदाबादच्या ओढव भागात राहणारी महिला, तिची आजी आणि १५
आणि १७
वर्षांची
दोन मुलं यांची हत्या करण्यात आली होती.
हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या ४८
तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने
महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे. हत्या
करुन आधी तो अहमदाबादहून सुरत, तर तिथून इंदौरला पळून गेला होता.
ओढव
भागातील दिव्यप्रभा सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंधी येत होती. सोसायटीच्या काही
पदाधिकाऱ्यांनी घरात डोकावण्याचा प्रयत्न केला पण घराला बाहेर कुलूप होतं.
स्थानिकांनी पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी घराचं कुलूप तोडून प्रवेश
केला असता आत वेगवेगळ्या खोल्यांमध्ये चौघांचे मृतदेह आढळला.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विनोद सारखे आपले जबाब बदलत
होता, त्यामुळे
पोलिसांचा संशय बळावला. हत्येचं नेमकं कारण त्याने सांगितलेलं नाही. मात्र कुठलाही
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जिवंत ठेवायचा नसल्याने त्याने कुटुंबातील चौघांचीही
हत्या केल्याचं सांगितलं.
आजेसासूवर आधीही हल्ला
विनोदने
पत्नी, दोन
अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची हत्या केल्याचा आरोप आहे. आजेसासूवर त्याने याआधीही
हल्ला केला होता, मात्र
नातीची अवस्था पाहून आजीने याविषयी वाच्यता केली नाही. आजी आणि नात एकाच परिसरात
राहत होत्या.