Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

स्वत:च्या स्वार्थासाठी, हौसेसाठी निष्पाप जीवांचा बळी; माणसं झाली‘जनावरं’ ...!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: मालवण तालुक्यातील एका गावात बैलांच्या झुंजीत एका बैलाचा हकनाक बळी गेला आहे. मालवण तळगाव येथील एका मैदानात कुडाळ येथील दोन   बैलाची झुंज   आयोजित करण्यात आली होती. ही झुंज तब्बल एक तास सुरू होती. या झुंजीत वेंगुर्लेतील बैल झुंजीच्या दरम्यान जखमी झाला होता , त्या बैलाचा अखेर मृत्यू झाला आहे. बैलांच्या झुंजीला सुप्रीम कोर्टाची बंदी आहे. असे असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत येथील खासदार विनायक राऊत यांच्या गावात घेण्यात आलेल्या या बैलांच्या झुंजीला परवानगी दिली कोणी , असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान , सध्या सोशल मीडियावर या झुंजीचे व्हिडिओ व्हायरल होत असून या मुक्या जनावराचे विव्हळणे मन हेलावून टाकणारे आहे. राजकीय पदाधिकाऱ्याशी संबंधित कार्यक्रम झुंजीत विजयी झालेला बैल हा कुडाळ नेरूर गावातील एका राजकीय पदाधिकाऱ्याचा होता म्हणून पोलीस गप्प होते का , असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना आता पडला आहे. याप्रकरणी आता कारवाईची मागणी होत आहे. तसेच अशाप्रकारच्या झुंजी होऊ नयेत , असाही सूर उमटत आहे. प्राणीप्रेमी संतप्त आता या बैलाच्या मृत्यूनंतर प्राणीप्...

आजेसासू, बायकोसह दोन लेकरांची हत्या, अखेर हत्येचं गूढ उकललं

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: अहमदाबादमध्ये राहणाऱ्या   मराठी कुटुंबातील   चौघांच्या हत्याकांडाने गुजरातसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या ४८   तासांत या हत्याकांडाचा   छडा लावला आहे. क्राईम ब्रांचने संशयित विनोद गायकवाड याला अटक केली आहे. विनोदने पत्नी , दोन अल्पवयीन मुलं आणि आजेसासूची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. काय आहे प्रकरण ? एकाच घरातून पोलिसांनी चार कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. अहमदाबादच्या ओढव भागात राहणारी महिला , तिची आजी आणि १५   आणि १७ वर्षांची दोन मुलं यांची हत्या करण्यात आली होती. हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या ४८   तासांत अहमदाबाद क्राईम ब्रांचने महिलेचा पती विनोद गायकवाडला हत्या प्रकरणातील संशयित म्हणून अटक केली आहे. हत्या करुन आधी तो अहमदाबादहून सुरत , तर तिथून इंदौरला पळून गेला होता. ओढव भागातील दिव्यप्रभा सोसायटीतल्या एका घरातून दुर्गंधी येत होती. सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी घरात डोकावण्याचा प्रयत्न केला ...

एसटीचे विलीनीकरण शक्य नाही- अजित पवार

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांना आंदोनल सुरु आहे. मात्र कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत आज संपणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही वाढवले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नाही. कोर्टाने दिलेली मुदत संपली ती कारवाई करु असं वक्तव्य   उपमुख्यमंत्री अजित पवार   यांनी केलं आहे.  पुढे ते म्हणाले ,  एसटी कर्मचाऱ्यांना   दिलेली मुदत आज संपणार आहे. मी आधीच सांगितलं होतं ३१ मार्चपर्यंत सगळ्यांना संधी द्या. आता तशा प्रकारची संधी दिली आहे. उद्यापासून कठोर भूमिका घेतली जाणार आहे. वेळ पडल्यास कर्मचाऱ्यांना काढून टाकून नवीन भरती केली जाऊ शकते. बेस्ट , पीएमपीएलने इलेक्ट्रॉनिक आणि सीएनजी बसेस कंत्राटवर घेतल्या आहेत. एका कंपनीने पीएमपीएलने चालवायला घेतल्या आहेत. त्याचा खर्चही कमी होतो आणि प्रवाशांचा फायदा होत , असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरकारने कोणताही निर्णय घेतला आणि न्यायव्यवस्थेनं निकाल दिला तर न्यायव्यवस्था सर्वोच्च असेल. त्यांनीही दिलेली मुदत संपली तर पुन्हा कठोर कारवाई करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला असतो , असंही पवार यांन...

चोरांच्या मदतीनेच उलगडल्या दहा घरफोड्या घटना;गुन्हे शाखा युनिट ३ची कारवाई

पुणे प्रतिनिधी: शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी थोड्या थोड थोडक्या नव्हे तर तब्बल १०   घरफोड्या उघडकीस आणल्या आहेत. चाकण , आळंदी , दिघी यता परिसरात हा चोरीच प्रकार घडलेत आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी ७   लाख ८०   हजार रुपये सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस , गुन्हे शाखा युनिट ३   च्या वतीने ही कारवाई करण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन उर्फ लंगड्या गोरक्षनाथ काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.   पोलिसांच्या   केलेल्या या कामगिरीचं नागरिकांनी कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ही वेशांतर करून खंडणी मागणाऱ्याला रंगेहात पकडले होते. या घटनांमुळे पिंपरी पोलीस पुन्हा अलर्ट मोडवर आल्याचे दिसून आले आहे. अशी केली कारवाई पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील एका महिन्यापासून चाकण , आळंदी , दिघी परिसरात घरफोड्या झाल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या घटनांची दाखल घेत पिंपरी चिंचवड पोलीस , गुन्हे शाखा युनिट 3 ने तपास करण्यास सुरुव...

एक्सप्रेसच्या खिडकीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, धक्कादायक घटना...

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: नांदेड रेल्वे स्टेशनवर आज सकाळी धक्कादायक घटना घडली. रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या तपोवन एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या खिडकीला बाहेरच्या बाजूने गळफास घेऊन एकाने   आत्महत्या केली   आहे. सकाळी ९   वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर उभी होती. गाडीच्या एका बोगीच्या खिडकीला लटकून सदर तरुणाने आत्महत्या केल्याचे प्रत्यक्षदर्शींना दिसले. त्यानंतर याविषयीची माहिती तत्काळ रेल्वे स्टेशन पोलीसांना देण्यात आली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय २५   वर्षांच्या आसपास असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. मयत कुणाचा परिचित असल्यास लोहमार्ग पोलीस नांदेड किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया मेलफेदेवार यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बुधवारी सकाळी तपोवन एक्सप्रेस मुंबईकडे निघण्यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर यार्डमध्ये उभी होती. या गाडीच्या एक डब्यातील शौचालयाच्या बाहेरच्या बा...

बनावट जॉइनिंग लेटर आणि दस्तवेज बनवून नोकरी लावण्याचं आमिष दाखवत चार लाखांची केली फसवणूक!

पुणे प्रतिनिधी: पिंपरी-चिंचवडमधील टाटा मोटर्समध्ये मुलींना कामाला लावतो असे सांगून जवळजवळ चार लाखांची फसवणूक केल्याची घटना पुण्यामध्ये समोर आलीय. खोटं जॉइनिंग लेटर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवल्यानं आपण या आमिषाला बळी पडल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ३८ वर्षीय विजय तांबे यांनी या प्रकरणामध्ये भोसरी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय. फारुख अहमद अली लासकर या ४० वर्षीय इसमाने आपली तीन लाख ९५ हजारांची आर्थिक फसवणूक केल्याचं तांबे यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातच , पैसे घेऊन नोकरी लावतो म्हणून अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये विजय तांबे त्यांचा मित्र सुनील बगाडे यांच्या मुलींना टाटा मोटर्स कंपनीत कामाला लावतो असा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ऑनलाइन आणि रोख असे एकूण तीन लाख ९५ हजारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. आरोपी फारुखने व्हाट्सअपवर टाटा मोटर्स कंपनीचे बनावट ज्वाइनिंग लेटर आणि दस्तावेज पाठवले तेव्हा आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं फिर्यादीला समजलं. या प्रकरणी त्यांनी भोसरी...

पाणीयोजनेसाठी कोणताही मोबदला न घेता अवघ्या रुपयात दिली एकरभर जागा

पारनेर प्रतिनिधी: पारनेर शहरासाठी सुमारे शंभर कोटी रुपयांची पाणीयोजना प्रस्तावित आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्याची तयारीही दाखविली आहे. ही योजना मुळा धरणाच्या बॅकवॉटरमधून कार्यान्वित होणार आहे. जलकुंभ , पंप हाऊस , जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी जागेची गरज होती. त्याकरिता स्व-मालकीची ३८   गुंठे जागा माजी नगरसेवक आनंदा औटी व शिक्षक नेते संभाजी औटी यांनी नगरपंचायतीस अवघा एक रुपया मोबदला घेऊन बक्षीसपत्र करून दिली. त्यांच्या दातृत्वाचे शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून बिकट आहे. मात्र , आमदार नीलेश लंके यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारात , तसेच निवडून आल्यावर पारनेरकरांना शब्द दिला आहे. शहरासाठी कायमस्वरूपीची पिण्याच्या पाण्याची योजना केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही , असा त्यांचा संकल्प होता.आमदार लंके हट्टाला पेटले असून , त्यांनी आता पाणीयोजनेसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास सुरवात केली आहे. या पाणीयोजनेचा सुमारे शंभर कोटी रुपयांच्या योजनेचा आराखडा तयार झाला आहे. मुळा बॅकवॉटरमधून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठ...

ड्युटीवरुन परतताना बाईक कारवर धडकली, वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

समर्थ भारत न्यूज नेटवर्क : वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा   अपघाती मृत्यू    झाल्याची घटना समोर आली आहे. कर्तव्यावरुन परत येत असताना त्यांना अपघात झाला होता. वर्धा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. दुचाकीची चारचाकी वाहनाला धडक बसून अपघात झाल्यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्याला   प्राण गमवावे लागले. संजय शंकरराव पोलार (वय ४९   वर्ष , रा. नाचणगाव) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा अपघात बोथली गावाजवळ घडला. संजय शंकरराव पोलार हे पहिले सैन्य दलात कार्यरत होते. तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वन विभागातील नोकरी स्वीकारली. पानेवाडी परिसरात त्यांची नोकरी असल्याने दररोज दुचाकीने ये-जा करत होते. नेमकं काय घडलं ? कर्तव्यावरून परतत असताना बोथली गावाजवळ उभ्या कारला दुचाकीची धडक बसल्याने संजय यांचा अपघात झाला. डोक्याला दुखापत झाल्याने पुलगावच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय पोलार यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.    

१ एप्रिलपासून कोरोना निर्बंध मुक्तीची गुढी

मुंबई प्रतिनिधी: गुडीपाडव्याच्या दिवशी राज्यातील जनतेला एक दिलादायक बातमी मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोकण्यात देशात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यामुळे गुडीपाडव्याच्या दिवशी   कोविडचे निर्बंध   पुर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आपत्ती व्यवस्थापण कायदा राज्यात लागू करण्यात आला होता. पण सध्या कोरोनाचा संसर्ग अल्प प्रमाणात असल्याने लावलेले निर्बंध हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे मास्क वापरणे आता बंधनकारक राहणार नाही. पण इतर देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने मास्क सोशल डिस्टन्सिंगसाठी सतत आवाहन करण्यात येत आहे. गुडीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांना खूशखबर मिळणार महाराष्ट्रात १   एप्रिलपासून कोरोना निर्बंधातून मुक्ती होणार  आहे. पण गुडीपाडव्याच्या दिवशीचं सगळ्यांना ही खूशखबर मिळणार आहे. दोन वर्षापासून मास्क वापरत असलेल्या जनतेची मास्कपासून सुटका होणार आहे. महाराष्ट्रात कोरोना साथीच्या दरम्यान राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घ...

बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोरोना घोटाळा..!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: कोरोना बाधित नसताना केवळ हेल्थ विमा पॉलिसीचे पैसे उकळण्यासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्याचे दर्शवण्यात आले.   औरंगाबाद   महापालिकेच्या चिकलठाणा मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला असून रुग्णाला येथून बनावट डिश्चार्ज कार्डदेखील मिळाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अशा प्रकारे बोगस कार्ड तयार करून कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्स कंपनीकडून ९   जणांनी विमा कंपनी कडून ४   लाख ६०   हजार रुपये उकळले. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमआयडीसी   सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घोटाळा कसा उघड झाला ? औरंगाबादेत लस न घेताच बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सक्रीय झाली होती. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आता कोरोनाचे उपचार न घेताच बोगस डिश्चार्ज कार्डच्या माध्यमातून विम्याची रक्कम लाटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कोटक जनरल इन्शुरन्समध्ये जहीर खान अजगर खान हे मुख्य व्यवस्थापक आहेत. कंपनीतील विम्यासाठी दाखल झालेल्या दाव्यांची प...

येरवडा कारागृहापासून होणार नवीन उपक्रमाला सुरवात; कैदीही होणार आत्मनिर्भर!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: राज्यातील वेगवेगळया कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या सुधारणेसाठी कारागृह प्रशासन कायम प्रयत्न करत असते. याबरोबरच आता कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांना ५०   हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे गृहमंत्री   दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले आहे.राज्य सहकारी बँकेतून ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज ७   टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात पुण्यातील येरवडा कारागृहातून केली जाणारा आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबवला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे उपक्रम कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी. कैदयांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कर्जरूपाने रक्कम दिली जाणार आहे. हे कर्ज घेता असताना कैद्याला जामीनदार देण्याची आवश्यकता नसणार आहे. शिक्षा भोगत असताना त्यांनी केलेल्या प्रामाणिक काम , त्यांना कारागृहात मिळणारे बंदीवेतन लक्षात घेत वैयक्तिक हमीवर हे कर्ज दिले जाणार आहे. देशातील हा पहिलाच उपक्रम असून १०५५   कैद्यांवरील न...

केस कापण्यास सांगितल्याने शाळकरी मुलांनीच वर्गप्रमुख विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण....

पुणे प्रतिनिधी: केस वाढल्याने शाळेत येताना केस कापून ये , असे सांगितल्याने शाळकरी मुलांनी वर्गप्रमुख विद्यार्थ्याला बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना पुण्यातील कोंढवा भागात घडली. या प्रकरणी चार अल्पवयीन शाळकरी मुलांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा १४ वर्षांचा मुलगा कोंढवा भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तो वर्गप्रमुख (मॉनीटर) आहे. त्याने वर्गातील दोन मुलांना केस का कापले नाहीस , अशी विचारणा केली. तसेच केस कापून न आल्यास वर्ग शिक्षकांकडे तक्रार करीन , असे त्याने सांगितल्याने त्याच्या वर्गातील दोन मुले चिडली होती. त्यातून शाळकरी मुले आणि त्यांच्या बरोबर असलेल्या दोन मुलांनी वर्ग प्रमुख विद्यार्थ्याला बांबू तसेच पट्ट्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्गप्रमुख विद्यार्थी जखमी झाला आहे. या प्रक्ररणी मारहाण झालेल्या मुलाच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

भावकीतील वाद अगदी विकोपाला;जमिनीवरुन सुरू असलेल्या संघर्षातून जीवघेणा हल्ला...

सांगली प्रतिनिधी : दोघा भावांसह तिघा जणांवर   सशस्त्र हल्ला   करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मारोळी आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथे वनक्षेत्रात हा प्रकार घडला. जंगलात दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने वार करुन तिघांचे हात-पाय तोडल्याचा आरोप आहे. भावकीतील अंतर्गत वाद आणि शेत जमिनीवरुन सुरू असलेल्या संघर्षातून हा हल्ला केल्याचे समोर येत आहे. काय आहे प्रकरण ? मंगळवेढा तालुक्यातील मारोळी आणि जत तालुक्यातील जाडरबोबलाद दरम्यान वन विभागाची जागा आहे. जंगल असल्याने नेहमीच हा परिसर निर्जन असतो. जाडरबोबलाद येथील बरुर यांच्या भावकीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. नेमकं काय घडलं ? रविवारी विठ्ठल बरुर , दयानंद बरूर आणि महादेव बरूर हे तिघे एकाच दुचाकींवरून जाडरबोबलाद जवळच असणाऱ्या नंदूर येथे एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून परत येत असताना वनक्षेत्रात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांना अडवून तलवारीने हल्ला चढवला. तिघेही गंभीर जखमी हल्ल्यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जत ...

अपघातानंतर ‘बर्निंग कारचा थरार’

शिरूर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील कोंढापुरी हद्दीत अपघाताचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ,  प्रवाशी वाहतुक कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यावेळी कारचा टायर फुटला या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. मात्र   अपघातग्रस्त   दुचाकीस्वाराला मदतीचा हात न देताच कार चालकाने टायर फुटलेला असतानाही कार भरधाव वेगाने पळवल्याचे समोर आले आहे. यामध्ये टायर तुटलेल्या अवस्थेत कार चालकाने तब्बल 5 ते 6 किलोमीटर कार चालवत शिक्रापुरपर्यंत पळवली   यावेळी धोकादायकरित्या कारच्या चाकाचा डिक्स मधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नेमकं काय घडलं   अपघातग्रस्त व्यक्तीला मदतीचा हात देणे आवश्यक पुणे – नगर महामार्गावर वाहनांची वर्दळ कायम असते. घटनेच्या वेळीही रस्त्यावर मोठया संख्येने वाहने होती. याचवेळी प्रवाशी वाहतुक कार आणि दुचाकीचा भिषण अपघात झाला. या अपघातानंतर कार चालकाने कारण थांबवताचा वेगानं कारचालवत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघातग्रस्त कार वेगानं चालविल्याने त्या कारचा टायर फुटून रस्त्याला घासतते गेली यावेळी त्यातून मोठ्याप्रमाणात ठि...