१४ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोहत्सव साजरा होणार- गौतम खरात
घोडेगाव प्रतिनिधी:
युगप्रवर्तक प्रतिष्ठाण संचलित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त जयंती मोहत्सव समितीचे अध्यक्ष अमित (भाऊ) रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक पार पडली या वर्षी दरवर्षी प्रमाणे घोडेगाव या तालुक्याच्या ठिकाणी दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा ना दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जयंती मोहत्सव साजरा होणार असल्याची माहिती युगप्रवर्तक प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष गौतमराव खरात यांनी दिली यावेळी दोन वर्षे कोरोना संकट संपूर्ण मानव जातीवर आले होते त्यामुळे मागील दोन वर्षे जयंती धुमधडाक्यात साजरी करता आली नव्हती परंतु आता कोरोना संकट जवळजवळ दूर झाले असून या वर्षी जयंती चांगल्या प्रमाणात करण्याचे सर्वच सदस्यांनी सांगितले यावेळेस कोरोना काळात ज्या लोकांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे मग त्या मध्ये डॉकटर,नर्स, परिचारिका,अंबुलन्स ड्रायव्हर,सामाजिक कार्यकर्ते ,सेवाभावी संस्था,पोलीस विभागातील कर्मचारी ,अधिकारी लॉकडाऊन काळात अन्नदान करणाऱ्या व्यक्ती ,संस्था यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात येणार असून आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना आंबेगाव भूषण पुरस्कार २०२२ वितरण सोहळा आयोजन करण्यात येणार आहे या मध्ये सामाजिक ,शैक्षणिक,
क्रीडा, कला,प्रशासकीय सेवा ,वैद्यकीय,विधीतज्ञ, इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून घोडेगाव शहरातून भव्य बाईक रॅली ,भव्य मिरवणूक( सवरगंधर्व बेंजो अवसरी खुर्द, तुकाई ढोल ताशा पथक कोटमदरा, जालिंदर शेवाळे यांचा सुप्रसिद्ध पारंपारिक ताफा , उंट,घोडे यांच्या समवेत,फटाक्यांची आतिषबाजी,विद्युत रोषणाई प्रसिद्ध व्याख्याते प्रा तानाजी बोऱ्हाडे यांचे भीमा तुझ्या जन्मामुळे..... या विषयावर व्याख्यान व मास्टर किरण महाजन यांचा भीमगीतांचा सदाबहार कार्यक्रम} होणार असून या कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री मा ना दिलीपराव वळसे पाटील ,शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सामाजिक न्याय चे राज्य प्रमुख ऍड जयदेव गायकवाड ,युवा नेतृत्व मा पूर्वाताई वळसे पाटील ,सर्व संस्थांचे अध्यक्ष,सभापती संचालक
तालुक्यातील सर्व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार असून कार्यक्रम धुमधडाक्यात होणार असल्याची माहिती अध्यक्ष अमित(भाऊ) रोकडे यांनी दिली.