Skip to main content

थोरांदळे शाळेच्या संतोष गवारी सर यांना जिल्हास्तरीय व मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार प्राप्त

मंचर:प्रतिनिधी


पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग आयोजित जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ माननीय नामदार श्री .अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते अल्प बचत भवन पुणे येथे पार पडला . यावेळी आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे शाळेचे आदर्श शिक्षक श्री संतोष कृष्णा गवारी यांना जिल्हास्तरीय पुरस्कार व शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेआहे .   कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ . निर्मलाताई पानसरे त्याचप्रमाणे माननीय श्री .आयुष प्रसाद साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे , माननीय श्री . रणजीत शिवतारे उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद पुणे हे कार्यक्रमात उपस्थित होते .

संतोष गवारी सर यांनी थोरांदळे शाळेमध्ये विविध उपक्रम तसेच उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला .

   गेल्या दहा वर्षांमध्ये थोरांदळे येथे त्यांनी एकूण ८८लाख ६३९रुपये निधी रोख आणि वस्तू स्वरूपात शाळेला मिळवून देण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे .

     त्याच प्रमाणे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी २००पेक्षा अधिक बक्षिसे मिळवली आहेत . त्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे .

    सतत चार वर्ष जिल्हा स्पर्धेत आंबेगाव तालुक्यातील खो-खो टीमचे नेतृत्व आणि यश संपादन केले आहे सन - २०१५ / १६ चा जिल्हा परिषद अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त करण्यामध्ये उल्लेखनीय  काम केले आहे .

त्याच प्रमाणे सन - २०२० /२१मध्ये एन एम एम एस परीक्षेमध्ये चार विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आले असून  शाळेचे १००% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .

 तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सहा विद्यार्थी गुणवत्ता यादी मध्ये आले आहेत . तसेच २०१५ / १६ मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश साठी एक विद्यार्थिनी ची निवड झाली होती . मंथन परीक्षा मध्ये यश संपादन केले आहे .

   मुळशी तालुक्यातील वळणे तसेच थोरांदळे या ठिकाणी निर्मलग्राम करण्यासाठी लोक जागृती केली  आहे स्वच्छ सुंदर शाळा सहभाग घेतला आहे .

 सलग बारा वर्षे अतिउत्कृष्ट कामकाज .

 १००% पटनोंदणी उपस्थिती .

 दरवर्षी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे कार्य केले आहे .

    शाळेत कार्यानुभव विषयांतर्गत गांडूळ खत प्रकल्प , सेंद्रिय शेती उपक्रम यशस्वीरीत्या राबवून जिल्ह्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे .

    इंग्रजी अध्ययन समृद्धी कार्यक्रम शाळेचा सहभाग .

    तसेच लीला लीला पूनावाला फाउंडेशन , पायजाम फाउंडेश , तसेच सेवाभावी संस्था व दानशुर ग्रामस्थांकडून कडून विशेष मदत मिळवून देण्यासाठी व्यवस्थापन व ग्रामपंचायतीच्या मदतीने विशेष प्रयत्न केले आहे . 

       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून शाळा महाराष्ट्र राज्य मॉडेल स्कुल बनविण्यासाठी विशेष सहकार्य केले आहे .

   यापूर्वी त्यांना आंबेगाव तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार .

    साई समर्थ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार . 

जुन्नर तालुका कला अध्यापक संघाकडून सन २०१७ / १८ मध्ये गुणवंत कलाध्यापक पुरस्कार .

 राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र (एनसीआरडी )यांच्याकडून उपक्रमशील शिक्षक पुरस्कार . थोरांदळे ग्रामस्थांच्या वतीने उल्लेखनीय काम केल्याबद्दल सन्मानित .

 आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेकडून नवोदय परीक्षा मार्गदर्शक म्हणून सन्मानित तसेच शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शक म्हणून सन्मानित .

 जिल्हा शैक्षणिक संस्था व्यवसायिक शिक्षण यांच्या मार्फत नवोदय उपक्रम स्पर्धेमध्ये जिल्ह्यात क्रमांक .

 सन २०१८ / १९चा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार .

तंत्र डिजिटल शैक्षणिक मासिक यांच्या तर्फे दिला जाणारा  लीडर अवार्ड ने सन - २०२० / २१ मध्ये सन्मानित .

 आंबेगाव तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक .

यासारखे एकूण सतरा पुरस्कार मिळालेले आहेत .

 याच कामाची नोंद घेऊन पुणे जिल्हा परिषदेने यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार व शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी  गावचे ग्रामस्थ , व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री.मंगेश फुटाणे , श्री . नितीन टेमगिरे सदस्य, श्री . रामदास टेमगिरे माजी अध्यक्ष आंबेगाव शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री . ठकसेन गवारी, श्री .प्रकाश गोफणे , श्री .अरविंद मोडवे , श्री . सखाराम वाजे , श्री .चेतन बेंढारी सर उपस्थित होते .

        पुरस्कार मिळाल्या बद्दल दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक दांगट साहेब तसेच मा .श्री .प्रदीपदादा वळसे पाटील साहेब , मा . श्री .गोविंद शेठ खिलारी साहेब , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश टेमगिरे नटवरलाल गवारी आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले तळेघरचे युवानेते संदीप मोरमारे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...