मंचर प्रतिनिधी:
कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंबेगाव तालुका यांच्या वतिने बुधवारी तहसिलदार कार्यालय घोडेगाव या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला तर संध्याकाळी मंचर येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने हिंदूत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्नाटकात सोशल मिडीयावर पोस्ट केली म्हणून हर्ष या कार्यकर्त्यांची निघृण हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ बजरंग दलाच्या वतिने मंचर येथील श्रीराम मंदिरापासुन शोक सभा याञेला सुरुवात करुन छञपती शिवाजी महाराज चौकात या शोक सभेची सांगता झाली. या वेळी बजरंग दलाचे सुमित शिनगारे यांनी बोलताना या घटनेचा तिव्र निषेध नोंदवला व अपराध्यांना फाशिची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी अनेकांनी हर्ष यांना मृणालिणी पडवळ, संतोष खामकर यांनी श्रद्धाजंली अर्पण केली. तहसिलदारांना निवेदन देण्यात आले त्यात म्हंटले आहे की, हर्ष या कार्यकर्त्यांची हत्या अतिशय निंदनीय घटना आहे. विषारी मानसिकता तसेच संविधान न मानणाऱ्या मानसिकतेने पछाडलेल्या नेतृत्वाकडुन जे विष पेरले जात आहे.त्याचा हा परिणाम आहे. या अशा मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी. व आरोपींना जरब बसेल अशी शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी, मातृशक्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा तसेच अन्य संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.