मंचर प्रतिनिधी:
थोरांदळे(डोंगरमळा)
ता.आंबेगाव येथून दिनांक. २०.फेब्रु.२०२२ रोजी मंगेश पोपट टेमगिरे(वय-३५) हा युवक थोरांदळे
येथील त्याच्या राहत्या घरातून बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्यांची पत्नी
सुवर्णा मंगेश टेमगिरे यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.फिर्यादीचे पती मंगेश हे
दि.२० रोजी मी कामानिमित्त बाहेर चाललो आहे असे सांगून निघून गेले.त्यानंतर त्यांचा
फोन बंद लागत असल्याने त्यांचा आजूबाजूला परिसरात व इतर नातेवाईकांकडे शोध घेतला
असता आजपर्यंत ते मिळाले नाही.यावरुन ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
बेपत्ता युवकाचे
वर्णन:
नाव: मंगेश
पोपट टेमगिरे(वय-३५) उंची ५.६ फूट, रंग-सावळा,चेहरा- उभट,अंगात सफेद रंगाचा शर्ट व
निळ्या रंगाचा पायजमा मराठी भाषा बोलतो तरी वरील वर्णनाचा युवक कुठे दिसल्यास मंचर
पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास मंचर पोलीस करत
आहे.