पुणे प्रतिनिधी :
कोरोना महासाथीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली नाही, तर बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे, असे निरीक्षण ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी नोंदवले.
पुणे इंटररनॅशनल
सेंटरतर्फे आयोजित एशिया इकॉनॉमिक डॉयलॉग या परिषदेत ‘महासाथीनंतरच्या जगात
उपजीविकेसाठीची निर्मिती आणि उत्पन्न वाढ’ या विषयावर झालेल्या चर्चेत लंडन स्कूल
ऑफ इकॉनॉमिक्समधील प्रा. मैत्रीश घटक, लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील प्रा.
अम्रिता धिल्लन, बांगलादेश इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजचे महासंचालक डॉ.
बिनायक सेन, न्यूयॉर्क विद्यापीठातील प्रा. जोनाथन मोर्डच यांनी सहभाग घेतला.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे या
चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते. महासाथीच्या काळातील आर्थिक विषयांबाबत
अभ्यासकांनी चर्चासत्रात भाष्य केले. भारतातील उद्योगांमधील रोजगारांमध्ये घट
झाली आहे. रोजगाराविना होणाऱ्या विकासाचा उपयोग नाही. कल्याणकारी योजना
राबवण्याकडे लक्ष द्यायला हवे. आर्थिक अडचणी लक्षात घेऊन खासगी क्षेत्राची
गुंतवणूक वाढवायला हवी, असे प्रा. घटक यांनी सांगितले. प्रा. ढिल्लन यांनी भारतातील महिला
कामगारांविषयीची निरीक्षणे नोंदवली.