मंचर प्रतिनिधी:
मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंचर भोरवाडी,ता.आंबेगाव,जि.पुणे येथे
अव्वैधरीत्या सोरट नावाच्या जुगाराचा मुद्देमाल जवळ बाळगून खेळत असताना व इतरांना
खेळण्यास भाग पाडत असल्याची मंचर पोलिसांनी रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी
गुन्ह्याची नोंद केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंचर
भोरवाडी,ता.आंबेगाव,जि.पुणे याठिकाणी अव्वैधरीत्या सोरट नावाच्या जुगाराचा
मुद्देमाल जवळ बाळगून खेळत असताना व इतरांना खेळण्यास भाग पाडत असल्याची माहिती
मंचर पोलिसांना गुप्त बातामिदारामार्फात समजली असता याबाबत पंच घेऊन घटनास्थळी
जाऊन कारवाई करण्यास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस
स्टाफ यांना सांगण्यात आले.
रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी मौजे भोरवाडी,ता.आंबेगाव,जि.पुणे
गावच्या हद्दीत बैलगाडा घाटाच्या पूर्व बाजूला असणाऱ्या झाडाच्या आडोशाला दोषी
महिला ताई बबन पवार (वय २१ वर्षे)सध्या राहणार.खराबवाडी,अभिनव हॉस्पिटलजवळ ता.आंबेगाव,जि.पुणे
हिने एक आयताकृती लांबीचा बोर्ड त्यावर छत्री,बॉल,फुलपाखरू यांसारखे इतर चिन्ह असे
वेगवेगळे १२ चिन्हे असलेला आणि त्यावर श्री साई नाव लिहिलेला बोर्ड एक निळ्या
रंगाचा कागदी चार्ट आणि त्यावर PAPPU
PLAYING PICTURES असे नाव असलेला त्यावर निळ्या व गुलाबी रंगाच्या
चिठ्ठ्या चिकटवलेला कागदाचा चार्ट तसेच
रोख रक्कम ३९००/- रुपये अशा वर्णनाचा सोरट नावाच्या जुगाराचा मुद्देमाल जवळ बाळगून
खेळत असताना व इतरांना खेळण्यास भाग पाडत असताना हि महिला मिळून आली आहे सदर
माहिती पोलिसांना समजली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन रंगेहाथ पकडले सदर
महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार करत आहे.