मंचर प्रतिनिधी:
मंचर येथील पुणे नाशिक महामार्गालगत असणाऱ्या संस्कृती हॉटेल समोर एका बेशिस्त कंटेनर चालकाने 62 वर्षीय व्यक्तीस धडक देऊन गंभीररित्या जखमी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे नाशिक महामार्गावर अवसरी खुर्द च्या हद्दीतील संस्कृती हॉटेल समोर उत्तर प्रदेश येथील पवन कुमार या इसमाने पुणेकडून नाशिककडे जात असताना त्याच्या ताब्यातील कंटेनर क्र. एन. एल. 01 ए. ई. 3247 या वाहनाने भोरवाडी येथील रहिवासी काळूराम गेनभाऊ कौदरे यांच्या स्कुटीला मागून येऊन जोरदार धडक दिली. यात त्यांच्या उजव्या पायाला आणि डोळ्याला किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून त्यांच्या ताब्यातील वाहनाचेही नुकसान झाले आहे.
याबाबत त्यांच्या मुलाने मंचर पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली असून मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साबळे हे पुढील तपास करत आहेत.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.