पुणे प्रतिनिधी:
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा
घालण्यासाठी साततत्याने पावले उचलत आहेत. मागील 11 महिन्यांपासून खुनाचा प्रयत्न
केल्यानंतर मोक्का कारवाई झालेले दोघे सराईत गुंड पोलिसांना चकवा देत होते.
त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी अनके ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला
यश येत नव्हते. या गुंडाच्या शोधासाठी पोलिसांनी कधी डिलेव्हरी बॉय, कधी गॅरेज मॅकेनिक तर कधी
दुधवालाचे वेषांतर करुन त्याचा शोध घेतला, मात्र गुंड पोलिसांना चकवा
देण्यात यशस्वी होत होते. अखेर पोलिसांच्या पथकाला या दोन्ही गुंडांना लोहगाव परिसरातून अटक करण्यात यश
आले आहे. शुभम दीपक पवळे आणि आकाश ऊर्फ स्काय मंगेश सासवडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
अशी केली करवाई
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून या दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत
होते. पोलीस त्यांच्या शोधात असताना आरोपी शुभम पवळे व आकाश सासवडे हे दोघेही
लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे
सापळा रचत दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल आहे. संबंधीत गुन्ह्यात त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली
आहे. यापूर्वी त्यांच्या 5 साथीदारांना
पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा
देत होते. फरार कालावधीत दोघे परराज्यात देखील वास्तव्यास होते.