मंचर प्रतिनिधी:
महाळुंगे पडवळ ता.आंबेगाव येथून दिनांक.१९.फेब्रु.२०२२ रोजी किसन नाथा घोडेकर(वय-५८) हे महाळुंगे पडवळ येथील त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झाले असल्याची तक्रार त्यांचा मुलगा तेजस किसन घोडेकर(वय-३४) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.फिर्यादीचे वडील किसन नाथा घोडेकर हे दि.१९ रोजी सायंकाळी ५च्या सुमारास मी गावात जातो आहे असे सांगून निघून गेले.त्यानंतर उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने त्यांचा आजूबाजूला परिसरात व इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता अजूनही ते मिळाले नाही.यावरुन ते बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:
नाव: किसन
नाथा घोडेकर (वय-५८) उंची ५.५ फूट, रंग-निमगोरा,चेहरा- उभट,अंगात सफेद रंगाचा खमीज
व पायजमा मराठी भाषा बोलतात तरी वरील वर्णनाचे आजोबा कुठे दिसल्यास मंचर पोलिसांशी
संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.