पुणे प्रतिनिधी :
पुण्यातील खेड घाटात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या
काही तासांत यश आलं आहे. दोघा जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली
आहे. जुन्या भांडणाच्या वादातून मित्रांनीच मित्राचा खून केल्याचा आरोप आहे. पुणे
नाशिक महामार्गावरील खेड घाटाच्या खोल दरीत 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला
होता. कोयत्याने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. खेड घाटात
एकत्र दारु पिऊन दोघांनी तरुणाचा खून केल्याचं समोर आलं आहे. आरोपीला दोन दिवसात
जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक
महामार्गावरील खेड घाटाच्या खोल दरीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
तरुणाच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार करुन मृतदेह खोल दरीत फेकण्यात आला होता.
स्वप्नील सखाराम चौधरी (वय 28 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत
मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु करण्यात
आला. या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आलं आहे.
जुन्या वादातून मित्राचा खून
दोघा
जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या वादातून
मित्रांनीच मित्राचा खून केल्याचा आरोप आहे. खेड घाटात एकत्र दारु पिऊन दोघांनी
तरुणाचा खून केल्याचं समोर आलं आहे. कोयत्याने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या
करण्यात आली होती.