प्रतिनिधी:पुणे
मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल,आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले आहे.
चालकाचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात
मिळालेल्या
माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर
यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून
कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी
फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळली. अति वेगात
असणाऱ्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्यामध्ये असणारे दुभाजक ओलांडून
मुंबईच्या दिशेने जाणार्या कंटेनरखाली ही कार घुसली. यामुळे कार आणि कंटेनर
यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्वच म्हणजेच पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
कार कंटेनरखाली गेल्यामुळे अपघात, प्रचंड वाहतूककोंडी
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच
महाराष्ट्र सुरक्षा बल, आयआरबी
पेट्रोलिंग, देवदूत
यंत्रणा, स्थानिक
ग्रामस्त, पोलीस
यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी
यांना बाहेर काढले. या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्या महामार्गावर प्रचंड
वाहतूककोंडी झाली असून बाकीच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.