सत्कर्म फाउंडेशन आणि समर्थ भारत परिवाराच्या वतीने वाफगावच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस चे वितरण.
प्रतिनिधी- वाफगाव
वाफगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 115 विद्यार्थ्यांना मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर आणि शालेय समिती अध्यक्ष सोनाली सोमनाथ वाफगावकर यांचे विशेष प्रयत्नातून सत-कर्म फाउंडेशन मुंबई व समर्थ भारत परिवार यांच्या वतीने स्पोर्ट ड्रेस (गणवेश) वितरण करण्यात आले. शाळा बंद असल्याने काही ठराविक विद्यार्थ्यांना बोलवून गणवेश वाटप करण्यात आले. सत-कर्म फाऊंडेशन मुंबई व समर्थ भारत परिवार आंबेगांव यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला सत्कर्म फाउंडेशनचे संचालक अनुज एन. नरुला, अँडव्होकेट हायकोर्ट मुंबई. दत्तात्रय डी.सावंत, डॉ. समीर पठाण सर (प्रदेश अध्यक्ष, राज्य पत्रकार महासंघ), डाँ.ओमप्रकाश गजरे सर, एम.डी.मुलाणी सर,भानुदास बो-हाडे सर, डॉ.हनुमंत भवारी सर, अदित्य चव्हाण सर, तारामती भागीत, सुवर्णा तांबे मुख्याध्यापक,वाफगाव.,मा.मुख्याध्यापक घंगाळदरे हुले सर. घाटकोपर मुंबई हनुमंत टाव्हरे, समाजसुधारक मेंगडे सरमुंबई,जिजाराम सोळसे सर, स्नेहा बारवे कार्यकारी संपादिका समर्थ भारत) वाफगाव प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोनालीताई वाफगांवकर, उपाध्यक्ष गणेश सुर्वे पाटील व सर्व सदस्य त्याचप्रमाणे ज्याच्या माध्यमातून सर्व शक्य झाले ते मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर तसेच गावातील सरपंच उमेश रामाणे, सरपंच राजेंद्र टाकळकर,तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर उपस्थित होते
त्यानंतर दत्तात्रय सावंत सर, मुलाणी सर, सांडभोर गुरूजी, तसेच बाळपाटील सुर्वे आदींनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच विदयालयाचे रामदास येवले सर यांनी उपस्थितांचे तसेच सत्कर्म फाउंडेशन आणि समर्थ भारत परीवाराचे आभार मानले त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.