प्रतिनिधी:समीर गोरडे
शिंगवे ता आंबेगाव येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भैरवनाथ विद्यालय,विकास सोसायटी येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला .
यावेळी ग्रामपंचायत शिंगवे येथे सरपंच सिता पवार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ येंथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.
यावेळी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते .
ग्रामस्थांनी ऑनलाईन पद्धतीने ग्रामसभा घेण्यास विरोध दर्शवत सभा रद्द केली आहे .
ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम पाळून ऑफलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी शिंगवे येथील ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील अनेक समस्या विविध प्रश्न गावातील पाणी रस्ते या सारखे मूलभूत प्रश्नही ग्रामसभेत समोरासमोर बसून सोडवता येतात ते ऑफलाइन पद्धतीने कसे मांडायचे हा प्रश्न उपस्थित करत या ग्रामस्थांनी ऑनलाइन सभा रद्द केली आहे शासनाने पुढील काही दिवसात ऑफलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आठवडे बाजार राजकीय सभा यासह विविध कार्यक्रमाला परवानगी मिळते मग ऑफलाइन ग्रामसभेला परवानगी का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित करीत ग्रामस्थांनी ग्रामसभा रद्द केली आहे