आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव शहरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा
प्रतिनिधी:आंबेगाव
सकाळी सकाळी सफेद पोषाक व इस्त्रीची कडक टोपी परिधान करून अनेक मान्यंवार घराबाहेर पडले होते, कोरोनाची पाश्वभुमी लक्षात घेता शाळकरी मुले सदर कार्यक्रमास मुकली आहे या वेळी सर्वप्रथम घोडेगाव पोलिस स्टेशन,मराठी दगडी जिल्हा परिषद शाळा , आंबेगाव पंचायत समिती , घोडेगाव ग्रामपंचायत , बि.डी काळे महाविदयालय ,आंबेगाव तहसिल कार्यालय, व शेवटी जनता विद्या मंदीर येथे ध्वजा वंदनाचा कार्यक्रम पार पडला असून मोठया उत्साहात २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा झालाय या प्रसंगी अनेक मान्यवर, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,नेते,कार्यकर्ते ,
विविध संस्थेचे पदाधिकारी , मुख्याध्यापक,शिक्षक, महसुल विभाग, आदिवासी विकास विभाग पदाधिकारी,कर्मचारी,पोलिस अधिकारी,फॉरेस्ट अधिकारी, विविध गावचे सरपंच उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक , तलाठी , दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी ध्वजा रोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधिल उद्देशिकेच सामुहिक वाचन तसेच राष्ट्रीय मतदार दिनाची शपथीचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच जनता विदया मंदीर मधील गुणवंत्त विदयार्थींचा वैष्णवी चारिटेबल ट्रस्ट कडून सन्मान करण्यात आला