प्रतिनिधी: कोल्हापूर
मुलीच्या जन्मावर नकारात्मक प्रतिक्रिया देत तोंड पाडून बसणारा समाज एकीकडे असताना. गुजरी येथील, जाधव दांपत्याने लाडकी लेक आराध्या हीचे स्वागत अनोख्या पद्धतीने करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सूरज जाधव आणि केतकी जाधव यांनी मुलगी झाल्याचा आनंद अभिनव पद्धतीने साजरा केला.
जाधव कुटुंबाने सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या मुला - मुलींना कपडे, बाळंतविडा सेट, बेबी शाम्पू, बेबी मसाज ऑइल, बेबी सोप, बेबी लोशन आणि बेबी पावडर अशा वस्तूंच्या किटचे वाटप केले
एकीकडे मुलगा हवा असा अट्टाहास करणारा समाज असताना, मुलीच्या जन्माचं स्वागत करताना जाधव कुटुंबाने आणि दाखवलेल्या दातृत्वा बद्दल त्यांचं कौतुक होत आहे.
यावेळी यश मालगावे, सम्राट पवार, अनुप पाटणकर, प्रसाद जाधव, मिलिंद मुळे, विनायक पाटील, रवी वागवेकर उपस्थित होते.