प्रतिनिधी : दत्ता नेटके
गोळेगाव तालुका जुन्नर येथील गावातील काही सामाजिक कार्यकर्ते गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असून त्यांच्या सामाजिक कार्याची सर्व गावकरी कौतुक करत आहेत. गोळेगाव गावातील माजी सरपंच केशव जगन्नाथ बिडवई. विश्वनाथ लोखंडे, गोपाळ वानी, सदाशिव ताम्हणे, शंकर ताम्हाणे, आर्यन बिडवई, हे ग्रामस्थ गावातील कुठलीही व्यक्ती मयत झाल्यास त्यामयत व्यक्तिच्या कुटूंबाला अंत्यविधी साठी लागणारे महत्त्वाचे लागणारे सामानाचा खर्च तसेच दशक्रिया विधी चा खर्च हे सर्वजण मिळून करत असतात. गावात एखादि व्यक्ती मयत झाल्यास त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतो त्या वेळी या दुःखाकित कुटुंबाच्या मदतीला धावून जात त्या कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा साठी लागणारे सर्व साहित्य किराणा हा स्वखर्चातून घेऊन येतात तसेच दशक्रिया विधीसाठी त्या कुटुंबाकडे खर्चासाठी पैसा नसेल तर तो खर्च देखील त्यांच्या माध्यमातून केला जातो. मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी पासून ते तेराव्या पर्यंतचा खर्च हे व्यक्ती उचलत असतात नंतर त्या कुटुंबातील व्यक्तीकडे पैसे आल्यानंतर ते पैसे ते घेत असतात.गेल्या अनेक वर्षांपासून ते हे सामाजिक कार्य करत असून या सामाजिक कामाचे सर्व गावकरी कौतुक करत आहेत. या आगळ्यावेगळ्या सामाजिक कामामुळे आमची भरभराट झाली असून आम्हाला कुठलीही अडचण येत नाही असे माजी सरपंच केशव बिडवई सांगतात तसेच तालुक्यातील इतर गावातील समाजसेवेचे आवड असलेल्या ग्रामस्थ व तरुणांनीही आपापल्या गावात या प्रकारे गरजूंना मदत करावी असे आवाहन या सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.