पेठ प्रतिनिधी:
पेठ ता आंबेगाव येथील पुणे जिल्हा सहकारी बँके शाखेचे स्थलांतर पेठ विकास सोसायटीच्या नवीन बांधलेल्या सोसायटी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये स्थलांतर झाले करण्यात आले आहे. नवीन इमारतीमध्ये बँकेचे सुसज्ज असे कार्यालय असून बँकेसमोर बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. नवीन जागेमध्ये शाखा स्थलांतर झाल्यामुळे बँकेच्या सातगाव पठार भागातील ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.बँकेच्या स्थलांतर कार्यक्रमानिमित्त
राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार करोनाचा चा प्रादुर्भाव लक्षात घेतात कार्यक्रम साध्या पद्धतीने आणि कोरोना नियमाचे पालन करून घेण्यात आला. पुणे जिल्हा
बँकेचे नवीन शाखेच्या स्थलांतर आणि उद्घाटन प्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती देवदत्त निकम, सरपंच संतोष धुमाळ ,सोसायटी चेअरमन विनायक धुमाळ ,शिवसेना उपतालका प्रमुख दिलीपराव पवळे, सुखदेव बुट्टे,सरपंच सचिन पानसरे ,अशोक बाजारे सरपंच मारूती थिटे पुणे जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. चव्हाण , एस एन खताळ , एस.एन हिंगे, एल. बी थोरात, पी एन घुले, शाखा धिकारी ए.एन लोंढे ,डी आर पारधी ,एन एस. थोरात , एन.एस.शिंदे , व्हि.ए.गायकवाड विकास अधिकारी एम.एन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
बँकेच्या सर्व सुविधा असलेल्या कार्यालय व एटी एम मशीन ची पाहणी देवदत्त निकम यांनी करून सोसायटीच्या चेअरमन तसेच सर्व संचालक व शाखा धिकारी ए एन लोंढे यांचे कौतुक केले.