पतीच्या निधनानंतर महिलेवर पाळत ठेवण्यासाठी दीर आणि सासऱ्याने संबंधित महिलेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे
पिंपरी प्रतिनिधी:
पतीच्या निधनानंतर महिलेवर पाळत ठेवण्यासाठी दीर आणि सासऱ्याने संबंधित महिलेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित महिलेला आणि तिच्या लेकीला शिवीगाळ करत मारहाण देखील केल्याचा आरोपी पीडित महिलेनं केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं दीर आणि सासऱ्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 59 वर्षी
पीडित महिला सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या 29 वर्षीय मुलीसोबत वास्तव्याला आहे. फिर्यादीच्या पतीचं अलीकडेच निधन
झालं आहे. पतीच्या निधनानंतर आरोपी 58 वर्षीय आरोपी दीर आणि 92 वर्षीय सासऱ्यांनी तिचा छळ सुरू केला आहे. पतीचं निधन होताच आरोपींनी
पीडितेवर नजर ठेवता यावी, यासाठी तिच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे.
जेणेकरून घरात काय सुरू आहे?
याची सर्व माहिती आरोपींना
मिळू शकेल. आरोपींकडून पीडितेवर 24
तास नजर ठेवली जात होती.
एवढंच नव्हे तर,
आरोपींनी तुम्ही दोघीही
आयत्यावर बिळावर बसला आहात, येथून निघून जा, असं म्हणून मायलेकीला
मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. आरोपीनं काही दिवसातच फिर्यादीच्या 29 वर्षीय मुलीला देखील त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच भररस्त्यात
त्यांना शिवीगाळ केली आहे. याशिवाय आरोपी दिरानं फिर्यादीच्या मुलीबाबत अश्लील
शेरेबाजी करत 'तुझी तर सेटिंगच लावतो' असं अश्लील बोलून मनास लज्जा निर्माण करत पीडित मायलेकीचा छळ केला
आहे.
आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेनं शनिवारी
सांगवी पोलीस ठाण्यात जाऊन दीर आण सासऱ्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील
तपास पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर करत आहेत.