समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
कोरोनानंतर प्रदीर्घ कालखंडानंतर कोल्हापूरातील
अंबाबाई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची
आता गर्दी वाढत असल्याने वादावादीच्या घटना घडत आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी
महाराष्ट्रासह अनेक राज्यांतूनही भाविक येत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला
अंबाबाईचे तात्काळ दर्शन पाहिजे असते त्यासाठी रांगेत उभा राहण्यापासून ते अगदी
ई-पास काढण्यासाठी वाटेल ते प्रयत्न भाविकांकडून केले जातात. आजही अंबाबाईच्या
दर्शनासाठी महिला आणि पुरुष रांगेत थांबले असता ई-पास काढण्यावरून त्यांच्यामध्ये
जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर सुरक्षिततेासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी
मध्यस्ती करून हा वाद मिटविण्यात आला.
फ्री स्टाईलने हाणामारी
आज सकाळी
अंबाबाई मंदिर परिसरात रांगेत उभा राहण्यावरून भाविकामंध्ये फ्री स्टाईलने
हाणामारी झाली. दर्शनासाठी लागणाऱ्या ई-पास काढताना हा वाद झाला आहे. ई-पास
काढण्यासाठी उभा महिला आणि पुरूष रांगेत थांबलेले असताना पास काढण्यावरून हाणामारी
झाली. ई-पास काढण्यासाठी उभा असताना वाद सुरू झाल्यानंतर एकमेकांना मारण्यासाठी
खुर्च्या उचलण्याचा प्रकारही घडला आहे. हा वाद सुरु असताना अंबाबाई मंदिर
परिसराच्या सुरक्षिततेसाठी थांबलेल्या पोलिसांच्या नजरेत हा वाद येताच त्यांच्या
मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला
रांगा असूनही वादवादी
कोल्हापूरातील
अंबाबाईच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. दर्शनासाठी होणाऱ्या
वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली
आहे. तरीही अंबाबाई मंदिर परिसरात याआधीही अनेकदा वादावादीचे प्रसंग घडले आहेत.
मंदिर प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य ती व्यवस्था देण्याचे प्रयत्न झाले आहेत तरीही
वादावादीचे प्रसंग घडत असल्याने लांबवरून येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण
पसरलेले असते.