पेठ प्रतिनिधी:
सातगाव पठार ता आंबेगाव भागात बिबट्याचा वावर वाढला असून कारेगाव फाट्यावर असं धोंडीभाऊ ठोंबरे यांच्या घरासमोरील शेळी गोठ्यात बिबट्या ने शेळीला हल्ला करून ठार मारली आहे.
सातगाव पठार भागात ज्वारी पीक वाढल्याने बिबट्या चा वावर वाढला आहे.त्यामुळे येथील शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कारेगाव फाट्यावर सौरग्या डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोंडीभाऊ ठोंबरे यांचे घर आहे.रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत बिबटयाने या शेतकऱ्यांच्या शेळीवर हल्ला केला आहे.त्यामुळे ठोंबरे कुटुंबातील सदस्य घाबरून गेले आहेत.घटनास्थळी वनरक्षक बी जी भालेराव व वन कर्मचारी एम एन पवळे यांनी भेट देऊन रीतसर
पंचनामा केला आहे.
त्यामुळे सदर गरीब शेतकऱ्यास मदत मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी धोंडीभाऊ ठोंबरे यांनी केली आहे.