प्रतिनिधी:मिथुन मोजाड
कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या तमाशा फड मालकांना पुन्हा १ फेब्रुवारीपासुन शासनाने तमाशा फड चालु करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे येणार्या काळात ग्रामीण भागात यात्रा जत्रा यामध्ये घुं गराचा ताल व ढोलकीची थाप वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दि.२२ तारखेला तमाशा कलापंंढरी असलेल्या नारायणगावात तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या घरासमोर तमाशाचे फड चालु करण्यास परवानगी मिळावी अन्यथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या घरासमोर आत्मदहन करु असा ईशारा दिला होता तेव्हा आमदार अतुल बेनके यांनी तमाशा कलावंतानी टोकाचे निर्णय घेऊ नका यातुन मार्ग काढू असे आश्वासन दिले
सोमवार दि.२४ रोजी मुंबई येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गृहमंत्री दिलीप वळसेपाटील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार अतुल बेनके, तमाशा फडमालक मोहित नारायणगावकर , अविष्कार मुळे, मुथ्थाभाई ईनामदार, यांच्या समवेत चर्चा करुन दि १फेब्रुवारीपासून तमाशाचे फड चालु करण्यास परवानगी दिली त्याचे शासन परिपत्रक २८ जानेवारीपर्यंत सर्व तमाशा फड मालकांना मिळेल .