प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क
शहरातील वाढती गुन्हेगारी कुणासाठी नवीन राहिलेली नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरची पोलिसांची पकड ढीली झाली आहे हे खुद पोलीस आयुक्तांनीही मान्य केले आहे. भर चौकात खून, पोलिसांवर गोळीबाराच्या घटनेनंतर आता तथाकथित सराईत गुंडाने तरुणाने त्याला फोनवर बोलताना . ‘भाई … का म्हटले नाही’ म्हणून अमानुष मारहाण करत कुत्रे खातात त्या पद्धतीने बिस्किटे खाण्यास भाग पाडत, कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्यांनी अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची खळबळजन घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला या आहे. हा प्रकार थेरगावातील गणेशनगर येथे घडला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते.
काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता.घटनेच्या वेळी
आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर
आरोपीने तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली, अशी विचारणा केली. याचा राग
आल्याने तू मला रोहन का म्हणालास, मला भाई का नाही म्हणाला, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणत रोहनने तरूणाला शिवीगाळ
केली. तसेच कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग
पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत बेल्टने व लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण
केली.
गुन्हा केला दाखल या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल
झाल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. रोहन वाघमारे या सराईतासह
प्रशांत आठवडे (रा. शिवकॉलनी, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (रा. ताथवडे), प्रेम शिंदे (रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल
झाला आहे. २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.