Skip to main content

आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला. स्मशानातंही दिवसभराची वेटिंग, अशी नागपूरची अवस्था होती. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करुन लोक हवालदिल झाले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 189 कोरोना मृत्यूची नोंद झालीय. या परिवाराला सरकारी 50 हजारांच्या मदतीची अपेक्षा होती. पण जिल्ह्यातील तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत. त्यापैकीच एक आहे नागपुरातील सौरभ ठुसे परिवार. नागपुरात दिघोरी परिसरात राहणारे तुळशीराम ठुसे यांना दुसऱ्या लाटेत कोरोनाने गाठलं. दोन-तीन दिवस घरी उपचार केले. रुग्णालयात बेड मिळत नव्हता. कसाबसा बेड मिळाला. उपचारावर तीन लाख खर्च केले. पण जीव वाचला नाही. आता त्यांच्या पेन्शनवर घर चालतंय. सरकारने 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली, त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. तीन डिसेंबर 2021 ला त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी अर्ज केला. पण अद्याप मदत मिळाली नाही, अशी माहिती सुनीता तुळशीराम ठुसे यांनी दिली.

तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट

तुळशीराम ठुसे यांचा मुलगा 27 वर्षांचा आहे. कोरोनात त्याचीही नोकरी गेली. आधार होईल म्हणून त्यांनी 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज केला. इतरांना 10-15 दिवसांत मदत मिळाली. पण दोन महिने लोटत आले तरिही सौरभ यांचा अर्ज पुढे सरकला नाही. सरकारी कार्यालयात जावं तर नीट उत्तरंही त्यांना मिळत नाही, अशी माहिती सौरभ ठुसे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरकारी आकड्यानुसार 10 हजार 189 कोरोना मृत्यूची नोंद आहे. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे मदतीसाठी 15 हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेत. यापैकी 10 हजारांपेक्षा जास्त जणांना मदत मिळाल्याचं अधिकारी सांगतात. तीन हजार पेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत.

अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे

नागपूर जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत. रुग्णालयाकडून कोविड मृत्यूचं प्रमाणपत्र मिळत नाही. कोविड मृत्यूचं प्रमाणपत्र नसल्याने 80 टक्के अर्ज रद्द झालेत. अर्जासोबत आधारकार्ड नसणे, बॅंक खात्याची नीट माहिती न देणे, परराज्य किंवा इतर जिल्ह्यातील रहिवासी अशी कारण यामागे आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी दिली. नागपूर जिल्ह्यात सरकारी माहितीनुसार आतापर्यंत 10 हजार 189 कोवीड मृत्यूची नोंद आहे. पण 50 हजार रुपयांच्या मदतीसाठी आलेले 15 हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे सरकारी आकडेवारीपेक्षा कोरोनाने कितीतरीपट जास्त मृत्यू झाले, हे वास्तव नाकारता येण्यासारखं नक्कीच नाही.

 

पॉप्युलर

आम आदमी पक्षाचे सालीम इनामदार पोलिसांच्या ताब्यात

  मंचर नगरपंचायतीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या विकास कामांचे बल्क टेंडर ला आम आदमी पक्षाच्या वतीने विरोध असून, याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्याच्या तयारीत असणाऱ्या आम आदमी पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सालीम इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सालीम इनामदार यांनी काही दिवसांपूर्वी मंचर नगर पंचायतीला निवेदन देऊन या गोष्टीला विरोध केला होता, मात्र नगर पंचायतकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करत, त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच याबाबतचे निवेदन देऊन निषेध करणार असल्याचे बोलले जात होते.  जुन्नर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा झालेला निषेध आणि तणावाची परिस्थिती पाहता इनामदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे बोलले जात आहे.

मराठा समाज्याच्या वतीने रस्ता रोको

समर्थ भारत वृत्तसेवा : लाखनगाव, विजय कानसकर, आंबेगाव तालुक्यातील रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) 18 फेब्रुवारी रोजी सकल मराठा बांधव आणि महिलांच्या वतीने बेल्हा जेजुरी, अष्टविनायक मुख्य महामार्गावर ट्रक आडवा लावला. या आंदोलनाची प्रमुख मागणी होती जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, तसेच राज्यातील जे मराठा  आमदार, खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर  पाठिंबा द्यावा. यासारख्या विविध मागण्या घेऊन मराठा  आंदोलकांनी हे आंदोलन रोडेवाडी फाटा ( पोंदेवाडी ) येथे केले आहे, याप्रसंगी प्रशासनाच्या वतीने आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करत महामार्ग सुरळीत सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, अष्टविनायक तसेच बेल्हा जेजुरी या मुख्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता शासन जरांगे पाटील यांच्या अटी पूर्ण करणार का पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको मराठा आंदोलनकर्ते करणार का? कारण जरांगे पाटील यांच...

लाखणगाव, पोंदेवाडी गावच्या हद्दीतून वाहने व इतर साहित्यांची चोरी

समर्थ भारत वृत्तसेवा: लाखणगाव पोंदेवाडी गावच्या हद्दीतून टेम्पो, बुलेट, स्प्लेंडर, व इतर साहित्य मिळून २ लाख ३१ हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दि. २६/१/२०२४ ते २७/१/२०२४ चे दरम्यान घडली असून या बाबत अन्सार गफुर चौघुले रा. लाखनगाव ता. आंबेगाव यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी अन्सार चौगुले यांचा शेती व वखार व्यवसाय असून त्यांनी वखार व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी एम. एच ०४ एस १३४८ टाटा कंपनीचा टेम्पो, तीन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १२ एम. टी २५४१ बुलेट गाडी, दोन वर्षांपूर्वी घेतलेली एम. एच १४ एच.एक्स ५११९ स्प्लेंडर मोटरसायकल हि वाहने आहेत. फिर्यादी यांनी पोंदेवाडी गावच्या हद्दीत रोडेवाडी फाटा येथे वखारीचे साहित्य, टेम्पो, दुचाकी व इतर साहित्य ठेवण्यासाठी कंपाउंड तयार केले असून ओपन शेडमध्ये वखार तयार केली आहे. दिनांक २६ रोजी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांच्या गाड्या शेडमध्ये ठेवल्या होत्या रात्री दहा वाजता शेताला पाणी भरून ते ओपन शेड व वखारीचे शेडला कुलुप लावून तेथेच एका रूम मध्ये झोपले होते. दि. २७ रोजी...