प्रतिनिधी:रामकृष्ण भागवत
श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माजी विद्यार्थी 1980 81 विद्या विद्या चा स्नेहमेळावा रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी मातोश्री मंगल कार्यालय सावरगाव याठिकाणी संपन्न झाला सर्व विद्यार्थी चाळीस वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे प्रत्येकाला भरपूर आनंद झाला प्रत्येकाने आपल्या मनातील भावना प्रगट केल्या यामध्ये शाळेविषयी असलेली आस्था आणि गुरूजन विषय असलेले प्रेम सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आपण सर्वजण चाळीस वर्षांनी एकत्रितपणे आपला ग्रुप तयार झाला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुख दुःखा मध्ये सहभागी व्हायचा आहे आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमीच मदतीला धावून जायचे आहे असेही भाव त्या ठिकाणी प्रगट केले याप्रसंगी गुरुवर्य मेहर बाई आणि कुटे सर उपस्थित होते यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला अशोक बाबुलनाथ बाळसराफ ,अशोक शांताराम बाळसराफ ,दत्तात्रेय लोखंडे ,विकास जुंदरे,रमेश शेलार ,सावकार गाढवे, निवृत्ती बाळसराफ ,रवींद्र शिरसागर, ज्ञानेश्वर वाबळे, एकनाथ बाळसराफ, जालिंदर तांबोळी, दादाभाऊ तांबोळी, खंडेराव शिंदे ,प्रकाश थोरात ,काशिनाथ कचरे ,बबन दातखिळे ,मधुकर मनसुख, ज्ञानेश्वर गाढवे ,सुवर्णा खराडे ,कल्पना घोलप ,रंजना बोराडे ,सुरेखा हांडे, मंदा ढोबळे ,मालिनी घोलप ,माणिक वाणी, मारुती जाधव, ज्ञानेश्वर गोरडे ,अविनाश मेहेर, पांडुरंग जुंदरे, शिवाजी वाणी रामदास खांडगे, भरत वाबळे ,हरिभाऊ गाढवे हे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निवृत्ती बाळसराफ अशोक बाबुलनाथ बाळसराफ अशोक शांताराम बाळसराफ आणि सुरेखा हांडे यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदन रामकृष्ण भागवत यांनी केले तर कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार सुरेखा हांडे यांनी मानले.