Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल

आंबेगाव प्रतिनिधी:  मंचर.                    26                               घोडेगांव.                 10 धामणी पारगाव.        09 अवसरी खु.              08        म.पडवळ                  03 पेठ                           03 खडकी.                     03 मोरडेवाडी.                02      अवसरी.   बू               02 गोहे.बू                        02       साकोरे    ...

राज्याच्या शिक्षण विभागात विसंवाद? ; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मंत्र्यांमध्येच परस्परविरोधी मते

प्रतिनिधी:पुणे राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षणमंत्री , राज्य मंडळ आणि शिक्षण राज्यमंत्री परस्पर विरोधी भूमिका मांडत असल्याने शिक्षण विभागात विसंवाद आहे का , असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने केली आहे. राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल तर बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. तसेच तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊनही राज्य मंडळाने परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याची तयारी केली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनीही परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्याची भूमिका मांडली आहे. मात्र शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. त्यामुळे पालक , विद्यार्थी , शिक्षकांमध्ये संभ्रम निर्...

आम्हाला 50 हजारांची मदत कधी मिळणार?; नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांचा प्रश्न

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला. स्मशानातंही दिवसभराची वेटिंग , अशी नागपूरची अवस्था होती. उपचारासाठी   लाखो रुपये खर्च करुन लोक   हवालदिल झाले. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजार 189 कोरोना मृत्यूची नोंद झालीय. या परिवाराला सरकारी 50 हजारांच्या मदतीची अपेक्षा होती. पण जिल्ह्यातील तब्बल तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट झालेत. त्यापैकीच एक आहे नागपुरातील सौरभ ठुसे परिवार. नागपुरात दिघोरी परिसरात राहणारे तुळशीराम ठुसे यांना दुसऱ्या लाटेत कोरोनाने गाठलं. दोन-तीन दिवस घरी उपचार केले. रुग्णालयात बेड मिळत नव्हता. कसाबसा बेड मिळाला. उपचारावर तीन लाख खर्च केले. पण जीव वाचला नाही. आता त्यांच्या पेन्शनवर घर चालतंय. सरकारने 50 हजार रुपये मदतीची घोषणा केली , त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या. तीन डिसेंबर 2021 ला त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी अर्ज केला. पण अद्याप मदत मिळाली नाही , अशी माहिती सुनीता तुळशीराम ठुसे यांनी दिली. तीन हजारांपेक्षा जास्त अर्ज रिजेक्ट तुळशीराम ठुसे यांचा मुलगा 27 वर्षांचा आहे. कोरोनात त्याचीही नोकरी गेली. आ...

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

प्रतिनिधी:पुणे मावळ येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मावळ तालुक्यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार कंटेनर यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली असून यामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणारी फोर्ड गाडी पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटनेरवर आदळल्याने हा अपघात घडला.   अपघाताची   माहिती समजताच महाराष्ट्र सुरक्षा बल , आयआरबी पेट्रोलिंग , देवदूत यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्त तसेच पोलीस यंत्रणा यांनी घटनास्थळी धाव घेत कंटेनरखाली अडकलेली गाडी आणि मृत प्रवाशी यांना बाहेर काढले आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे भीषण अपघात मिळालेल्या माहितीनुसार जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय. मुंबईहून पुण्याच्या दिशे...

सत्कर्म फाउंडेशन आणि समर्थ भारत परिवाराच्या वतीने वाफगावच्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस चे वितरण.

प्रतिनिधी- वाफगाव  वाफगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे 115 विद्यार्थ्यांना मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर आणि शालेय समिती अध्यक्ष  सोनाली सोमनाथ वाफगावकर यांचे विशेष प्रयत्नातून सत-कर्म फाउंडेशन मुंबई व समर्थ भारत परिवार यांच्या वतीने स्पोर्ट ड्रेस (गणवेश) वितरण करण्यात आले. शाळा बंद असल्याने काही ठराविक विद्यार्थ्यांना बोलवून गणवेश वाटप करण्यात आले. सत-कर्म फाऊंडेशन मुंबई व समर्थ भारत परिवार आंबेगांव यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला सत्कर्म फाउंडेशनचे संचालक  अनुज एन. नरुला, अँडव्होकेट हायकोर्ट मुंबई. दत्तात्रय डी.सावंत, डॉ. समीर पठाण सर (प्रदेश अध्यक्ष, राज्य पत्रकार महासंघ), डाँ.ओमप्रकाश गजरे सर, एम.डी.मुलाणी सर,भानुदास बो-हाडे सर, डॉ.हनुमंत भवारी सर, अदित्य चव्हाण सर, तारामती भागीत, सुवर्णा तांबे  मुख्याध्यापक,वाफगाव.,मा.मुख्याध्यापक घंगाळदरे हुले सर. घाटकोपर मुंबई हनुमंत टाव्हरे, समाजसुधारक मेंगडे सरमुंबई,जिजाराम सोळसे सर,  स्नेहा बारवे कार्यकारी संपादिका समर्थ भारत) वाफगाव प्राथमिक शाळेत...

गोळेगाव येथील ग्रामस्थ करतात आगळ्या वेगळ्या पद्धतीने समाजसेवा

प्रतिनिधी : दत्ता नेटके  गोळेगाव तालुका जुन्नर येथील गावातील काही सामाजिक कार्यकर्ते गावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असून त्यांच्या सामाजिक कार्याची सर्व गावकरी कौतुक करत आहेत.   गोळेगाव गावातील माजी सरपंच केशव जगन्नाथ बिडवई. विश्वनाथ लोखंडे, गोपाळ वानी, सदाशिव ताम्हणे, शंकर ताम्हाणे, आर्यन बिडवई, हे ग्रामस्थ गावातील कुठलीही व्यक्ती मयत झाल्यास त्यामयत व्यक्तिच्या कुटूंबाला अंत्यविधी साठी लागणारे महत्त्वाचे लागणारे सामानाचा खर्च तसेच दशक्रिया विधी चा खर्च हे सर्वजण मिळून करत असतात. गावात एखादि व्यक्ती मयत झाल्यास त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतो त्या वेळी या दुःखाकित कुटुंबाच्या मदतीला धावून जात त्या कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा साठी लागणारे सर्व साहित्य किराणा हा स्वखर्चातून घेऊन येतात तसेच दशक्रिया विधीसाठी त्या कुटुंबाकडे खर्चासाठी पैसा नसेल तर तो खर्च देखील त्यांच्या माध्यमातून केला जातो. मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यविधी पासून ते तेराव्या पर्यंतचा खर्च हे व्यक्ती उचलत असतात नंतर त्या कुटुंबातील व्यक्तीकडे पैसे आल्यानंतर ते पैस...

लाँड्रीचालकाला महाराष्ट्राचा सॅल्यूट, लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परत करणारा ‘माणूस’ झाला श्रीमंत!

  प्रतिनिधी:पुणे राज्यात रोज खून , दरोडा , चोरीच्या घटना घडतात. दागिन्यांची   चोरी   होण्याचे प्रमाण तर बरेच आहे. चुकून एखादा दागिना हरवला तर तो परत मिळण्याची शक्यता धुसरच असते. आपल्या आजूबाजूला आजकाल प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी झाली आहे. अशा परिस्थितीत आपली नितीमत्ता ढळू न देणाऱ्या एका माणासाचे उदाहण समोर आले आहे. पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील राजकमल कनोजिया यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने परत केले आहेत. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी सोन्याचे मंगळसूत्र , अंगठी , गळ्यातील हार असे दागिने सुखरुप ठेवले आणि मालकाला ते परत केले आहेत. विशेष म्हणजे राजकमल कनोजिया हे अमराठी असून ते लॉन्ड्रीचालक आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. नेमकं काय घडलं ? पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया यांनी रविवारी इस्त्रीसाठी आपले कपडे शुभलक्ष्मी ड्रायक्लिनर्समध्ये दिले होते. त्यानंतर मंगळवारी हे कपडे इस्त्री करताना राजमल कनोजिया यांना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला ...

तोंडात बोळा, डोळ्यावर पट्टी, हात-पाय बांधून बेदम मारहाण, धावत्या वाहनातून तलावात फेकलं, जालन्यात थरारक अपहरण!!

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क तोंडात बोळा कोंबून , हात-पाय बांधून बेदम मारहाण करत एका व्यवसायिकाचे थरारक अपहरण झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. तालुक्यातील मादळमोही येथील व्यावसायिकाचे तीन अज्ञातांनी साठेवाडी फाट्यावरून अपहरण केले. अपहरण केल्यानंतर व्यावसायिकाला भरधाव वाहनात बेदम करण्यात आली. दहा लाख रुपयांची खंडणी दे नाही तर जीवे मारतो , अशी धमकी देण्यात आली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने   व्यावसायिकाला धावत्या वाहनातून   तलावात फेकून देण्यात आली. त्याची जीपही कालव्यात ढकलून दिली आणि दुसऱ्या वाहनातून अपहरणकर्ते फरार झाले. 26 जानेवारी रोजी ही घटना घडली. व्यावसायिकानं सांगितली अपबिती … व्यावसायिकावर उपचार सुरु जालन्यातील कैलास शिंगटे या व्यावसायिकाचे अहरण झाले होते. जेसीबी , पोकलेनचा त्यांचा मोठा व्यवसाय आहे. 26 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरून कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावरून येत होते. त्यावेळी साठेवाडीजवळ त्यांच्या दुचाकीला जीपने जोरात धडक दिली. खाली कोसळलेल्या कैलास शिंगटेंना अपहरणकर्त्यांनी उचलून जीपमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या ...

फोनवर बोलताना भाई का? म्हटला नाही म्हणून खायला लावली कुत्र्यासारखी बिस्किटे

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क शहरातील वाढती गुन्हेगारी कुणासाठी नवीन राहिलेली नाही. शहरातील कायदा व सुव्यवस्थेवरची पोलिसांची पकड ढीली झाली आहे हे खुद पोलीस आयुक्तांनीही मान्य केले आहे. भर चौकात खून , पोलिसांवर गोळीबाराच्या घटनेनंतर आता तथाकथित सराईत गुंडाने तरुणाने त्याला फोनवर बोलताना . ‘ भाई … का म्हटले नाही ’ म्हणून अमानुष मारहाण करत कुत्रे खातात त्या पद्धतीने बिस्किटे खाण्यास भाग पाडत , कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्यांनी अमानुष पद्धतीने मारहाण केल्याची खळबळजन घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला या आहे. हा प्रकार थेरगावातील गणेशनगर येथे घडला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमक काय घडलं?   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच त्याची तडीपारी संपल्याने तो हद्दीत आला होता.घटनेच्या वेळी आरोपी रोहनने पीडित तरुणाला भेटायला बोलावले. पीडित तरुण भेटायला गेल्यानंतर आरोपीने तरूणाने रोहनला तू मला फोनवर शिवीगाळ का केली , अशी विचारणा केली. याचा राग आल्या...

शिक्षक पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा; ७ हजार ८०० अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास

प्रतिनिधी:समर्थ भारत न्यूज नेटवर्क  शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात रोज नवीन खळबळजनक माहिती समोर येत असतानाच आता नवीन खुलासा समोर आलाय. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ म्हणजेच टीईटीसाठी अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आल्याचं सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडालीय. २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठवरण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तरपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जातेय. २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निक...

ग्रामपंचायत शिंगवे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे येथे ध्वजारोहन उत्साहात साजरा

  प्रतिनिधी:समीर गोरडे शिंगवे ता आंबेगाव येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भैरवनाथ विद्यालय,विकास सोसायटी येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मोजक्याच लोकांच्या उपस्थिती मध्ये साजरा करण्यात आला . यावेळी ग्रामपंचायत शिंगवे येथे सरपंच सिता पवार यांच्या हस्ते व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैजनाथ येंथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली.   यावेळी सरपंच उपसरपंच पोलिस पाटील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ  उपस्थित होते . ग्रामस्थांनी ऑनलाईन पद्धतीने ग्रामसभा घेण्यास विरोध दर्शवत सभा रद्द केली आहे . ग्रामस्थांनी शासनाचे सर्व नियम पाळून ऑफलाइन पद्धतीने ग्रामसभा घेण्यास शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी शिंगवे येथील ग्रामस्थांनी  केली आहे.  गावातील अनेक समस्या विविध प्रश्न गावातील पाणी रस्ते या सारखे मूलभूत प्रश्नही ग्रामसभेत समोरासमोर बसून सोडवता येतात ते ऑफलाइन पद्धतीने कसे मांडायचे हा प्रश्न उपस्थित करत या ग्रामस्थांनी ऑनला...

कन्यारत्न झाल्याने जाधव कुटूंबाने जपली सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी: कोल्हापूर मुलीच्या जन्मावर नकारात्मक प्रतिक्रिया देत तोंड पाडून बसणारा समाज एकीकडे असताना. गुजरी येथील, जाधव दांपत्याने लाडकी लेक आराध्या हीचे स्वागत अनोख्या पद्धतीने करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. सूरज जाधव आणि केतकी जाधव यांनी मुलगी झाल्याचा आनंद अभिनव पद्धतीने साजरा केला. जाधव  कुटुंबाने सावित्रीबाई फुले हॉस्पिटल आणि पंचगंगा हॉस्पिटल मध्ये जन्मलेल्या मुला - मुलींना कपडे, बाळंतविडा सेट, बेबी शाम्पू, बेबी मसाज ऑइल, बेबी सोप, बेबी लोशन आणि बेबी पावडर अशा वस्तूंच्या किटचे वाटप केले एकीकडे मुलगा हवा असा अट्टाहास करणारा समाज असताना, मुलीच्या जन्माचं स्वागत करताना जाधव कुटुंबाने आणि दाखवलेल्या दातृत्वा बद्दल त्यांचं कौतुक होत आहे. यावेळी  यश मालगावे, सम्राट पवार, अनुप पाटणकर, प्रसाद जाधव, मिलिंद मुळे, विनायक पाटील, रवी वागवेकर उपस्थित होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयातील गृहमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची घेतली भेट.

  प्रतिनिधी:समर्थ भारत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयातील गृहमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन (प्रोबेशन) अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीसांची चांगली प्रतिमा आणि पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबरच वर्दीच्या सर्वोच्चतेचा सन्मान करा असे मार्गदर्शन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केले.   पोलीसांकडून जनतेला चांगल्या वर्तनाची तसेच न्याय मिळण्याची अपेक्षा असते. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयातच नव्हे तर समाजात वावरतानादेखील आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांप्रती जागरूक राहिले पाहिजे, असे गृहमंत्री म्हणाले. कोरोना काळात पोलीसांनी गरीब व गरजूंना मोठया प्रमाणावर केलेल्या मदतीमुळे पोलीसांबद्दल जनमानसामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास टिकविण्याबरोबरच जनतेशी संपर्क आणि संवाद वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही ते म्हणाले. कर्तव्य बजावताना पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय मि...

आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव शहरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा

 प्रतिनिधी:आंबेगाव सकाळी सकाळी सफेद पोषाक व इस्त्रीची कडक टोपी परिधान करून अनेक मान्यंवार घराबाहेर पडले होते,  कोरोनाची पाश्वभुमी लक्षात घेता शाळकरी मुले सदर कार्यक्रमास मुकली आहे या वेळी सर्वप्रथम घोडेगाव पोलिस स्टेशन,मराठी दगडी जिल्हा परिषद शाळा , आंबेगाव पंचायत समिती , घोडेगाव ग्रामपंचायत , बि.डी काळे महाविदयालय ,आंबेगाव तहसिल कार्यालय, व शेवटी जनता विद्या मंदीर येथे ध्वजा वंदनाचा कार्यक्रम पार पडला असून मोठया उत्साहात २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा झालाय या प्रसंगी अनेक मान्यवर, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी,नेते,कार्यकर्ते , विविध संस्थेचे पदाधिकारी , मुख्याध्यापक,शिक्षक, महसुल विभाग, आदिवासी विकास विभाग पदाधिकारी,कर्मचारी,पोलिस अधिकारी,फॉरेस्ट अधिकारी, विविध गावचे सरपंच उपसरपंच , सदस्य , ग्रामसेवक , तलाठी , दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी पत्रकार मित्र  या ठिकाणी उपस्थित होते. या वेळी ध्वजा रोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या  संविधानामधिल उद्देशिकेच सामुहिक वाचन तसेच राष्ट्रीय मतदार दिनाची शपथीचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच जनता विदया मंदीर मधील गुणवंत्त ...

महाराष्ट्राची लोककला १ फेब्रुवारीपासुन रंगणार

प्रतिनिधी:मिथुन मोजाड  कोरोनाच्या आर्थिक संकटात सापडलेल्या  तमाशा  फड मालकांना  पुन्हा १ फेब्रुवारीपासुन शासनाने तमाशा फड चालु करण्यास  परवानगी दिली आहे.                                   त्यामुळे येणार्‍या काळात ग्रामीण भागात यात्रा जत्रा यामध्ये घुं गराचा ताल व ढोलकीची थाप  वाजण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दि.२२ तारखेला  तमाशा कलापंंढरी असलेल्या नारायणगावात  तालुक्याचे आमदार  अतुल बेनके यांच्या घरासमोर   तमाशाचे फड चालु करण्यास परवानगी मिळावी अन्यथा  पालकमंत्री अजितदादा पवार  यांच्या घरासमोर आत्मदहन करु असा ईशारा दिला होता तेव्हा आमदार अतुल बेनके यांनी तमाशा कलावंतानी टोकाचे निर्णय घेऊ नका यातुन मार्ग काढू असे आश्वासन  दिले                         सोमवार  दि.२४  रोजी  मुंबई येथे  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार  गृहमंत्री दिलीप वळसेपाटील  ...

बिबट्याने शेळीवर हल्ला करत शेळीला ठार केले आहे.

पेठ  प्रतिनिधी: सातगाव पठार ता आंबेगाव भागात बिबट्याचा वावर वाढला असून कारेगाव फाट्यावर असं धोंडीभाऊ ठोंबरे यांच्या घरासमोरील शेळी गोठ्यात बिबट्या ने शेळीला हल्ला करून ठार मारली आहे. सातगाव पठार भागात ज्वारी पीक वाढल्याने बिबट्या चा वावर वाढला आहे.त्यामुळे येथील शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. कारेगाव फाट्यावर सौरग्या डोंगराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोंडीभाऊ ठोंबरे यांचे घर आहे.रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत बिबटयाने या शेतकऱ्यांच्या शेळीवर हल्ला केला आहे.त्यामुळे ठोंबरे कुटुंबातील सदस्य घाबरून गेले आहेत.घटनास्थळी वनरक्षक बी जी भालेराव व वन कर्मचारी एम एन पवळे यांनी भेट देऊन रीतसर  पंचनामा केला आहे. त्यामुळे सदर गरीब शेतकऱ्यास मदत मिळावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी  धोंडीभाऊ ठोंबरे यांनी केली आहे.

ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माजी विद्यार्थी 1980-81 दहावी बॅचचा स्नेह मेळावा संपन्न

प्रतिनिधी:रामकृष्ण भागवत    श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव माजी विद्यार्थी 1980 81 विद्या विद्या चा स्नेहमेळावा रविवार दिनांक 23 जानेवारी 2022 रोजी मातोश्री मंगल कार्यालय सावरगाव याठिकाणी संपन्न झाला सर्व विद्यार्थी चाळीस वर्षांनी एकमेकांना भेटल्यामुळे प्रत्येकाला भरपूर आनंद झाला प्रत्येकाने आपल्या मनातील भावना प्रगट केल्या यामध्ये शाळेविषयी असलेली आस्था आणि गुरूजन विषय असलेले प्रेम सर्वांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले आपण सर्वजण चाळीस वर्षांनी एकत्रितपणे आपला ग्रुप तयार झाला आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुख दुःखा मध्ये सहभागी व्हायचा आहे आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव गरजू विद्यार्थ्यांसाठी आपण नेहमीच मदतीला धावून जायचे आहे असेही भाव त्या ठिकाणी प्रगट केले याप्रसंगी गुरुवर्य मेहर बाई आणि कुटे सर उपस्थित होते यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला अशोक बाबुलनाथ बाळसराफ ,अशोक शांताराम बाळसराफ ,दत्तात्रेय लोखंडे ,विकास जुंदरे,रमेश शेलार ,सावकार गाढवे, निवृत्ती बाळसराफ ,रवींद्र शिरसागर, ज्ञानेश्वर वाबळे, एकनाथ बाळसराफ, जालिंदर तांबोळी, दादा...

पेठ ता आंबेगाव येथील जिल्हा सहकारी बँकेचे नवीन इमारतीत स्थलांतर

पेठ प्रतिनिधी: पेठ ता  आंबेगाव येथील पुणे जिल्हा सहकारी   बँके शाखेचे स्थलांतर  पेठ विकास सोसायटीच्या  नवीन बांधलेल्या सोसायटी कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये स्थलांतर झाले करण्यात आले  आहे. नवीन इमारतीमध्ये बँकेचे सुसज्ज  असे कार्यालय असून बँकेसमोर बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. नवीन जागेमध्ये शाखा स्थलांतर झाल्यामुळे बँकेच्या सातगाव पठार भागातील  ग्राहकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बँकेच्या स्थलांतर कार्यक्रमानिमित्त  राज्याचे गृहमंत्री  दिलीपराव वळसे पाटील  यांच्या सूचनेनुसार करोनाचा चा प्रादुर्भाव लक्षात घेतात कार्यक्रम साध्या पद्धतीने आणि कोरोना  नियमाचे पालन करून घेण्यात आला. पुणे जिल्हा बँकेचे नवीन शाखेच्या स्थलांतर आणि उद्घाटन प्रसंगी मंचर  कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती  देवदत्त निकम,  सरपंच  संतोष धुमाळ  ,सोसायटी चेअरमन  विनायक धुमाळ ,शिवसेना उपतालका प्रमुख दिलीपराव  पवळे, सुखदेव बुट्टे,सरपंच  सचिन पानसरे ,अशोक  बाजारे सरपंच मारूती...

पतीच्या निधनानंतर महिलेवर पाळत ठेवण्यासाठी दीर आणि सासऱ्याने संबंधित महिलेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे

पिंपरी प्रतिनिधी: पतीच्या निधनानंतर महिलेवर पाळत ठेवण्यासाठी दीर आणि सासऱ्याने संबंधित महिलेच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित महिलेला आणि तिच्या लेकीला शिवीगाळ करत मारहाण देखील केल्याचा आरोपी पीडित महिलेनं केला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं दीर आणि सासऱ्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 59 वर्षी पीडित महिला सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या 29 वर्षीय मुलीसोबत वास्तव्याला आहे. फिर्यादीच्या पतीचं अलीकडेच निधन झालं आहे. पतीच्या निधनानंतर आरोपी 58 वर्षीय आरोपी दीर आणि 92 वर्षीय सासऱ्यांनी तिचा छळ सुरू केला आहे. पतीचं निधन होताच आरोपींनी पीडितेवर नजर ठेवता यावी , यासाठी तिच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहे. जेणेकरून घरात काय सुरू आहे ? याची सर्व माहिती आरोपींना मिळू शकेल. आरोपींकडून पीडितेवर 24 तास नजर ठेवली जात होती. एवढंच नव्हे तर , आरोपींनी तुम्ही दोघीही आयत्यावर बिळावर बसला आहात , येथून निघून जा , असं म्हणून मायलेकीला मा...

महाराष्ट्रातील घाटात ट्रकचालकाचा कुणी केला खून? 24 तासांच्या आत पोलिसांनी लावला शोध!

समर्थ भारत न्यूज नेटवर्क: पंजाबमधून स्पिरीट भरुन गोव्याकडे निघालेल्या ट्रकचालकाचा महाराष्ट्रातील फोंडा   घाटात खून करण्यात आला होता.   या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना चोवीस तासांच्या आतच दिल्लीतून अटक केली आहे. फोंडा घाटात नियोजनबद्धरीत्या ट्रक चालकाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. शनिवारी ट्रकच्या केबीनमध्ये पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम केल्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं उघड झालं होतं. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तरलोकसिंग धरमसिंग असल्याचं समोर आलं होतं. वय वर्ष 54 असलेल्या तरलोकसिंह हे पंजाबमधून गोव्याच्या दिशेनं ट्रक घेऊन चालले होते. पण वाटेतच त्यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी हत्या झाल्याचं कळताच विशेष पथक नेमून 24 तासांच्या आत दोघांना बेड्या ठोकल्यात. का करण्यात आली हत्या ? ट्रक चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. यातील संशयित आरोपी कमलजीत हा पाच वर्षांपासून मृत धरमसिंहच्या ओळखीचा होता. अधनंमधनं तो त्या...

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात फ्री स्टाईल हाणामारी, ई-पासवरून रंगला वाद

 समर्थ भारत न्यूज नेटवर्क: कोरोनानंतर   प्रदीर्घ कालखंडानंतर   कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर   भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची आता गर्दी वाढत असल्याने वादावादीच्या घटना घडत आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह   अनेक राज्यांतूनही भाविक येत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अंबाबाईचे तात्काळ दर्शन पाहिजे असते त्यासाठी रांगेत उभा राहण्यापासून ते अगदी ई-पास काढण्यासाठी वाटेल ते प्रयत्न भाविकांकडून केले जातात. आजही अंबाबाईच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुष रांगेत थांबले असता ई-पास काढण्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर सुरक्षिततेासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिटविण्यात आला. फ्री स्टाईलने हाणामारी आज सकाळी अंबाबाई मंदिर परिसरात रांगेत उभा राहण्यावरून भाविकामंध्ये फ्री स्टाईलने हाणामारी झाली. दर्शनासाठी लागणाऱ्या ई-पास काढताना हा वाद झाला आहे. ई-पास काढण्यासाठी उभा महिला आणि पुरूष रांगेत थांबलेले असताना पास काढण्यावरून हाणामारी झाली. ई-पास काढण्यासाठी उभा असताना वाद सुरू झाल्यानंतर एकमेका...

आहुपे गावात 'सरपंच चषक' या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

घोडेगाव प्रतिनिधी: अनिल नटू भोईर व रमेश लोहकरे सरपंच यांच्या सौजन्यांने , आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी आहुपे खोऱ्यातील आहुपे गावात ' सरपंच चषक ' या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकवन्या संघाला भरघोस बक्षिस देखील ठेवण्यात आले होते. प्रथम् क्रमांक:- ४४ , ४४४ व्दितीय क्रमांक:- ३३ , ३३३ तृतीय क्रमांक:-२२ , २२२ चतुर्थ क्रमांक:-११ , १११ या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोव्हीड चे सर्व नियम पाळून , जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग नोंदवला. ही स्पर्धा १९ जानेवारी ते रविवार २३ जानेवारी या कालावधीत पार पडली. या स्पर्धेमध्ये   एकुन ४० संघानी आपला सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळीने खेळाडूंने प्रक्षेकांची मने जिकंली. या पैंकी ज्या चार संघानी सर्वोत्कृष्ट खेळ केला , ते संघ नंबर दाखल सेमी फायन मध्ये जाऊन पोहचले , २३ जानेवारी रोजी ' केडे पाटील ' मैदानावर टेनिस क्रिकेटचा फायनलचा थरार रंगला. सर्वोत्कृ खेळ केल्याने खालील संघाने आपले नाव सरपंच चषकावरती कोरले.   १) प्रथम् क्रमांक:- लायन हा...

भीषण अपघातात मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी जाहीर केली मदत.

समर्थ भारत न्यूज नेटवर्क:   वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा इथं काल रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे विद्यार्थी होते. या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कसा झाला होता हा अपघात ? वर्धा देवळी मार्गावर मध्यरात्री दीड वाजता हा भीषण अपघात घडला. या मार्गावरील सेलसुरा इथल्या दुभाजकाला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. त्यात गाडीतल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतल्या सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास अपघात झाल्याचं लक्षात आलं. त्याने याबद्दल सावंगी पोलिसांना माहिती दिली.