पुणे प्रतिनिधी:
अमेझॉन वेबसाइटवरून खरेदी केलेली वस्तू खराब निघाल्यानंतर ती परत घेण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने हुज्जत घालत ग्राहकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.हांडेवाडी येथील ग्रँड एटरीया जी बिल्डींगच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला.
याबाबत अभिजित कदम नावाच्या डिलिव्हरी बॉय विरोधात साकीब शमीन अफरीन (वय ३५, गँड, एटरीया जी. बिल्डींग, हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ डिसेंबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. रुग्णालयातून मारहाणी बाबतचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.