मंचर प्रतिनिधी:
श्री.क्षेत्र वडगाव काशिंबेग ग्रामपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री ई श्रम कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांची कार्ड काढली होती. अशा लोकांचे कार्ड वाटप मा. मंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे व भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने दि 30 डिसेंबर सांयकाळी 5 वाजता ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिर येथे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार,तालुका संघटक संदीपभाऊ बाणखेले,अटल बिहारी विचार मंच अध्यक्ष प्रमोद बाणखेले, आरोग्यदूत सुशांत थोरात, उपाध्यक्ष रोहन खानदेशे, गणेश बाणखेले,बंटी क्षीरसागर ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष संतोष कडूसकर, तंटामुक्त अध्यक्ष सचिन टेके मा.ग्रा.सदस्य व सर्व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी 50 कार्डाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी विजयराव पवार यांनी संपूर्ण योजनेची माहिती नागरिकांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक आरोग्यदूत बाबू थोरात यांनी केले तर आभार ग्राम सुरक्षा दल सचिव बंटी क्षीरसागर यांनी मानले.