प्रतिनिधी : मंचर
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगाव जिल्हा पुणे या पथकाने आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे मोठी कारवाई केली असून अंदाजे 9 लाख 14 हजार 432 रुपयांचा मद्याचा साठा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क, नारायणगांव विभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दि. 30/12/2021 रोजी एकलहरे ता.आंबेगाव गावाचे हद्दीत, हॉटेल पंचमीच्या मागे, बनावट मद्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या वरून सापळा रचून तपासणी करीत असताना दोन इसम बनावट देशी विदेशीमद्य एक मारुती सुझुकी कपंनीच्या चारचाकी वाहन जिया वाहन क्र. MH 12 SX 5296 या वाहनातून विक्रीच्या उद्देशाने घेवून जात असताना त्याना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. सदर इसमांकडे पुढील चौकशी केल्यावरुन सदरचा बनावट मद्यसाठा त्यांनी काळेवाडी, पिंपरी, पुणे येथे निर्माण करून तेथुनच ते ठोक ग्राहकांना वितरीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याठिकाणी जावून त्यांच्या कब्जातून चारचाकी वाहन क्र. MH 12 SX 5296 ,इम्पिरीयल ब्ल्यू व्हिस्की , मॅकडॉल ,व्हिस्की, देशीदारु , 35 लि. क्षमतेचे 3 स्पिरिट प्लॅस्टीक कॅन , देशीदारु टैगोपंच, विदेशीमद्य इम्पिरीयल ब्ल्यू व मॅकडॉल, इम्पिरीयल ब्ल्यू, मॅकडॉल व देशीदारु,सिलींग मशीन, इसेन्स (अर्क) 03 बाटल्या, बनावट दारु निर्मितीचे इतर साहीत्य वेगवेगळ्या कंपनीचे 2 मोबाईल असा एकूण किंमत रुपये 09,14,432/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी 1) सागर तुकाराम कातोरे, वय 42 वर्षे रा. चिबळी, ता. खेड, जि. पुणे. 2) मयुर बाळासाहेब कातोरे, वय 26 वर्षे, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे यांना महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दि. 31/12/2021 रोजी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. 03/01/ 2022 पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्त कांतीलालजी उमाप, पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक श्री.जाधव व श्री.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्क विभाग नारायणगाव निरीक्षक ए. बी. पवार, निरीक्षक एस. एम. परले, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, एन. आर. मुंजाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जी. एम. नीळ, एस. वाय दरेकर जवान सर्वश्री जे. जी. दाते, व्ही. डी. विंचुरकर, एम. टी. केंगले व जवान नि वाहनचालक आर. ए. पाचारणे हे सहभागी होते. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक ए. बी. पवार हे करीत आहेत.