पिंपरी प्रतिनिधी:
फय्याज राशद शहा (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. फिर्यादी शहा हे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी एका रिक्षात बसलेल्या पाच जणांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली.
त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या हातावर ब्लेड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर फिर्यादीकडे असलेली रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण एक लाख ४० हजारांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला.