प्रतिनिधी मंचर:
अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथून राहत्या घरातून रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद मुलीचे वडील रत्थूलाल मधोसाई सोनी ( वय 51 रा.अवसरी खु।। बैलघाट शेजारी ता आंबेगाव जि पुणे ,मूळ रा. गाव बलगीखार, डगनिया खार मोहल्ला, सोनी पार ता.कटघोरा जि.कोरबा रा.छत्तीसगड ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी त्यांच्या कुटुंबासमवेत अवसरी खु! येथे कामानिमित्त राहत आहेत. दिनांक 27/12/ 20२१ रोजी फिर्यादी आपली पत्नी व मुली बरोबर घरात झोपले असता रात्री साडेअकराच्या वाजताच्या सुमारास फिर्यादी हे उठले असता त्यांना घरात मुलगी दिपीका दिसली नाही त्यांनी मुलीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच त्यांच्या झोपडी शेजारी राहणारा नितेश महादेव राम ( रा.बिहार हा देखील दिसला नसल्याने त्यांच्या मुलीला नितेश रामने कसले तरी आमिष दाखवून पळून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पो हवा डावखर करत आहे.
मुलीचे वर्णन खालील प्रमाणे
नाव दिपीका रत्थुलाल सोनी ( वय 13 वर्ष 11 महीने 21 दिवस )
उंची चार फूट 2 इंच बाद मध्यम केस काळे अंगात हिरव्या रंगाचा सलवार कुर्ता नाकात फुली कानात मोठी रिंग गोल चेहरा कपाळावर टिकली छत्तीसगढी बोलते.