मंचर प्रतिनिधी:
थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी तुषार तुळशीराम फुटाणे (वय २३, रा. थोरांदळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी सांगितले की, फुटाणे याने ‘‘आपण दोघे लग्न करू व बाहेर कोठेतरी निघून जाऊ.’’ असे म्हणून तिला मोटर सायकलवर बसवून पळवून चास (ता. खेड) येथील त्याच्या मावशीच्या घरी नेले. तेथे ता. २६ डिसेंबर रोजी तिच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्थापित केले. याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार पुढील तपास करत आहेत.