Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

दुचाकी व ट्रकच्या अपघातात युवकाचा मृत्यू

 प्रतिनिधी : मंचर  कळंब ता.आंबेगाव गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवे रोडवर ट्रक व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.30/12/ 2021 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत संदेश शिवाजी भालेराव ( वय 32 रा. कळंब ता. आंबेगाव जि. पुणे ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 30/12/2021 रोजी फिर्यादीचा भाऊ दिपक उर्फ सचिन शिवाजी भालेराव ( वय 29 रा.कळंब ता.आंबेगाव हा त्याच्या ताब्यातील शाईन मोटरसायकल एम.एच.14 जे. एफ. 1370 या दुचाकी वरून नारायणगाव बाजूकडून कळंब बाजूकडे पुणे नाशिक हायवे रोड येत असताना त्याने नारायणगाव बाजूकडे जाणारा ट्रक नंबर आर जे 19 जी जी 3258 या ट्रकला ओव्हरटेक करत असताना त्याची ड्रायव्हर बाजूस जोरात ठोसर लागल्याने अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यु झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तो मयत झाले असल्याचे सांगितले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास मंचर प...

आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे अवैध बनावट दारूचा साठा जप्त

 प्रतिनिधी : मंचर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग नारायणगाव जिल्हा पुणे या पथकाने आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे मोठी कारवाई केली असून अंदाजे 9 लाख 14 हजार 432 रुपयांचा मद्याचा साठा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क, नारायणगांव विभाग यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दि. 30/12/2021 रोजी एकलहरे ता.आंबेगाव गावाचे हद्दीत, हॉटेल पंचमीच्या मागे, बनावट मद्याची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्या वरून सापळा रचून तपासणी करीत असताना दोन इसम बनावट देशी विदेशीमद्य एक मारुती सुझुकी कपंनीच्या चारचाकी वाहन जिया वाहन क्र. MH 12 SX 5296 या वाहनातून विक्रीच्या उद्देशाने घेवून जात असताना त्याना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. सदर इसमांकडे पुढील चौकशी केल्यावरुन सदरचा बनावट मद्यसाठा त्यांनी काळेवाडी, पिंपरी, पुणे येथे निर्माण करून तेथुनच ते ठोक ग्राहकांना वितरीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याठिकाणी जावून त्यांच्या कब्जातून चारचाकी वाहन क्र. MH 12 SX 5296 ,इम्पिरीयल ब्ल्यू व्हिस्की , मॅकडॉल ,व्हिस्की, देशीदारु , 35 लि. क्षमतेचे ...

अल्पवयीन बालिकेने रोखला बलात्कार; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घडवली अद्दल

पुणे प्रतिनिधी: मैत्रिणीचे प्रेमप्रकरण घरी सांगितल्याने १६ वर्षाच्या मुलाने हात कापून घेतला आहे. त्याचा सलाईन लावले असून खरे खोटे करण्यासाठी त्याने एका १२ वर्षाच्या मुलीला आपल्या रुमवर बोलावून घेतले. तेथे तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण, या १२ वर्षाच्या मुलीने त्याला सर्व शक्तीनिशी प्रतिकार करत हाताने व लाथा मारुन अंगावरुन खाली पाडले व स्वत:ची सुटका करुन घेतली. या घटनेची माहिती मिळताच हडपसरपोलिसांनी काही तासातच पळून जाणाऱ्या या नराधमासह १६ वर्षाच्या मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले. ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे २८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी १२ वर्षाच्या मुलीने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रशांत ऊर्फ गोट्या प्रकाश थिट्टे (वय २६, रा. तुकाईनगर, काळेपडळ, हडपसर) याला अटक केली आहे. तसेच त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ येथील १२ वर्षाच्या मुलीला एक १६ वर्षाचा मुलगा तुला मारुन टाकीन, तुला कोयत्याने कापून टाकीन अशी, धमकी देत व या मुलीला त्याचे मेसेज तिच्या मैत्रिणीला देण्यास सां...

खळबळजनक! पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर चोरीला

पुणे प्रतिनिधी: काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना चोरट्याने हिसका दाखविला आहे. त्यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. याप्रकरणी रमेश बागवे यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ ते भवानी पेठेतील अरुणकुमार वैदय स्टेडियम दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही. त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले १ लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. याबाबत रमेश बागवे यांनी सांगितले की, आपण कारमधील सीटच्या मागील कप्प्यात रिव्हॉल्व्हर ठेवले होते. २८ डिसेंबरला दिवसभर विविध कार्यक्रम होते. त्या दरम्यान, चोरट्याने कारमधून हे रिव्हॉल्व्हर चोरुन नेले. काही वेळेने हा रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर घरातही सर्व ठिकाणी शोधले. त्यानंतर आता खडक पोलिसाकडे फिर्याद दिली आहे.

श्री.क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे ई श्रम कार्ड वाटप

मंचर प्रतिनिधी: श्री.क्षेत्र वडगाव काशिंबेग ग्रामपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री ई श्रम कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांची कार्ड काढली होती. अशा लोकांचे कार्ड वाटप मा. मंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे व भाजप तालुकाध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे  यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने दि 30 डिसेंबर सांयकाळी 5  वाजता ग्रामदैवत प्रभू श्रीराम मंदिर येथे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजप  पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार,तालुका संघटक संदीपभाऊ बाणखेले,अटल बिहारी विचार मंच अध्यक्ष प्रमोद बाणखेले, आरोग्यदूत सुशांत थोरात, उपाध्यक्ष रोहन खानदेशे, गणेश बाणखेले,बंटी क्षीरसागर ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष संतोष कडूसकर, तंटामुक्त अध्यक्ष सचिन टेके मा.ग्रा.सदस्य व सर्व लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी 50 कार्डाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले.या वेळी विजयराव पवार यांनी संपूर्ण योजनेची माहिती नागरिकांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक आरोग्यदूत बाबू थोरात यांनी केले तर आभार ग्राम सुरक्षा दल सचिव बंटी क्षीरसागर यांनी मानले.

अहमदाबादचा पोलीस आयुक्त बोलतोय म्हणत घातला पोलिसांनाच गंडा

  पिंपरी प्रतिनिधी: मी अहमदाबाद पोलीस आयुक्त विजयिसंग साहेब बोलतोय, असे सांगून पैसे उकळणाऱ्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खबऱ्या असल्याची बतावणी करून त्याने वारंवार पोलिसांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कामगिरी केली. खलीउल्लाहा अयानुल्लाह खान (वय ४२, रा. जोगेश्वरी, मुंबई), असे अटक केलेल्या तोतयाचे नाव आहे. त्याला शुक्रवारपर्यंत (दि. ३१) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ८ ते २८ डिसेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पोलीस नियंत्रण कक्षात पोलिसांना वारंवार फोन केला. मी अहमदाबाद पोलीस आयुक्‍त विजयसिंग साहेब बोलतोय,  आपल्या पोलीस आयुक्‍तांचा फोन नंबर द्या, असा कॉल आरोपीने केला. त्यानुसार पोलीस आयुक्‍तांचा फोन नंबर देण्यात आला. त्यानंतर आरोपीने पुन्हा कॉल केला. तुमचे पोलीस आयुक्त यांना मी वारंवार फोन करतो, परंतू ते माझा फोन उचलत नाहीत. पिपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयाच...

ब्लेडने वार करून गॅरेजवाल्याला लुटले; पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी प्रतिनिधी: पाच जणांनी गॅरेजवाल्यावर हल्ला केला. मारहाण तसेच ब्लेडने वार करून त्याला जखमी केले. तसेच्या त्याच्याकडील एक लाख ४० हजार ३०० रुपयांचा माल जबरदस्तीने काढून नेला. आंबेडकर चौक, पिंपरी येथे मंगळवारी (दि. २८) पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला. फय्याज राशद शहा (वय २९, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा गॅरेजचा व्यवसाय आहे. फिर्यादी शहा हे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास पिंपरी येथील आंबेडकर चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी एका रिक्षात बसलेल्या पाच जणांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. त्यातील एका आरोपीने फिर्यादीच्या हातावर ब्लेड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर फिर्यादीकडे असलेली रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण एक लाख ४० हजारांचा ऐवज आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतला.

MPSC: आयोगाने घातले परीक्षार्थींच्या बोलण्यावर निर्बंध; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला?

पुणे प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षा आणि निकालासंदर्भात समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या टिका-टप्पणीवर आयोगाची आता नजर असणार आहे. यापुढील काळात विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार/व्यक्ती यांच्याकडून केल्या जाणाऱ्या असभ्य, असंस्कृत, असंसदीय व अश्लील भाषेतील टीका-टिपणी/ संभाषण केल्यास त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आयोगाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या परीक्षा देणारे विद्यार्थी किंवा परीक्षार्थी विविध सोशल मीडियावर आयोगाची जी बदनामी करतात ती थांबवण्याकरिता परिपत्रक काढले असल्याचे आयोगाने या परिपत्रकात नमूद केले आहे. तर आयोगाने हे परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणल्याची भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. समाजमाध्यमांवर आलेल्या प्रतिक्रिया- १. आदर कर्तुत्वातून कमवावा लागतो. तो असा धमकावून मिळत नाही. अशी हुकूमशाही भाषा वापरून विद्यार्थ्यांना धमकावणे बंद करावे. कोणाचे नुकसान करण्या...

माळशेज घाटात बोगदा तयार करण्याची मागणी

बेल्हे : प्रतिनिधी कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावर ‘माळशेज घाट पायथा ते घाटमाथा’ दरम्यान बोगदा तयार करण्यात यावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जुन्नर तालुक्यातील नागरिकांना माळशेज घाटमार्गे मुंबईला जाण्यासाठी हा जवळचा महामार्ग आहे. या महामार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्याच्या दिवसात माळशेज घाटात दरडी कोसळण्याचा धोका असतो. या घाटात अनेकदा अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत. माळशेज घाट रस्त्यासाठी ‘घाटपायथा ते घाटमाथा’ असा बोगदा तयार केल्यास प्रवाशांच्या वेळेची बचत होऊ शकेल. प्रवासी वर्गाचा प्रवास सुरक्षित होऊ शकेल, असेही पांडुरंग पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनाही पाठवले आहे.

सैन्यात मेजर असल्याचे भासवून उमेदवारांची फसवणूक; बनावट लष्करी अधिकाऱ्याचा पर्दाफाश

पुणे - प्रतिनिधी आरोग्य भरती, शिक्षक पात्रता परिक्षा, म्हाडामधील भरतीमधील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आता सैन्यातील भरतीमध्ये देखील गैरप्रकार  होत असल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. सैन्यात मेजर असल्याचे भासवीत नाशिक येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटर येथे सुरू असलेल्या भरती मेळाव्याद्वारे सैन्यात भरती करून देण्याच्या बहाण्याने उमेदवारांची फसवणूक  करणाऱ्याचा बनावट लष्करी अधिकाऱ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाच्या पुणे युनिटने ही कारावार्इ केली. गणेश बाळू पवार (रा. हर्सूल गाव, चांदवा तहसिल, जिल्हा नाशिक) असे या तोतयाचे नाव आहे. त्याला अटक करून नाशिक पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पवार याला देवळाली कॅन्टोन्मेंट येथून पकडण्यात आले.लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा मंगळवारी (ता. २८) लष्कराची मेजर ही रँक असलेला लढाऊ गणवेश (कॉम्बॅट युनिफॉर्म) घालून देवळाली कॅन्ट परिसरात फिरत असत. परिसरात फिरण्यासाठी तो एमएच १५ जीएक्स ४८८८ क्रमांकाची मारुती अर्...

पुण्यात तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज; वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा चिंतेचे वातावरण

पुणे प्रतिनिधी: जिल्ह्यात वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांची ही वाढती संख्या लक्षात घेता प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. कुठल्याही परिस्थीतीचा सामना करण्यासाठी १५ हजार ५७५ ऑक्सीजन खाटा, ३ हजार ३३७ अतिदक्षता विभागातील खाटा तर १ हजार ८२५ व्हेटीलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यात ही संख्या टप्याटप्याने वाढली आहे. गुरुवारी पुणे शहरात २९८, पिंपरी चिंचवडमध्ये ८०, नगर पालिका क्षेत्रात १०, कॅन्टोन्टमेंट परिसरात २० तर ग्रामीण भागात ६९ असे एकुण जिल्ह्यात ४७७ रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकुण २ हजार ५५६ सक्रीय कोरोना बाधित रुग्ण आहेत. ही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा धास्तावले असून खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १५ हजार ५७५ ऑक्सिजन खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर ३ हजार ३३७ अतिदक्षता विभागातील ...

कर्जाच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

पुणे : प्रतिनिधी मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची पावणे तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कात्रज येथील ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी महिलेचा खासगी ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. व्यावसायासाठी या महिलेला कर्जाची गरज होती. त्यासाठी तिने एका संकेतस्थळावरुन माहिती घेतली. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने या महिलेशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्याने तिला ‘प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने’तून कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून २ लाख ८० हजार ६७५ रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे पाठविल्यानंतर संबंधित व्यक्तीशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस निरीक्षक संगीता यादव तपास करीत आहे.

श्री क्षेत्र भिमाशंकर परिसरात नाकाबंदी

घोडेगाव : प्रतिनिधी मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री क्षेत्र भिमाशंकर व येथील अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे कोणतेही गालबोट लागू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला नाकाबंदी करून कायदा मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी आदेश लागू आहे. श्री क्षेत्र भिमाशंकर येथे पर्यटनाच्या नावाखाली होणाऱ्या दारू पार्ट्या व इतर अवैध धंदे रोखण्यासाठी जुन्नर फाटा, डिंभा, तळेघर, म्हातरबाची वाडी याठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहेत. पोलिस व्हॅनद्वारे पेट्रोलिंग सुरू आहे. पर्यटन स्थळावर डीजे लावून धांगडधिंगा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ‘‘वन कर्मचाऱ्यांमार्फत जंगलातून पेट्रोलिंग केले जाणार आहे. म्हातारबाची वाडी याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या चेक नाक्यावर कडक तपासणी करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती भिमाशंकर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.

पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी तब्बल ७०३ मालकांची नावनोंदणी

मंचर : प्रतिनिधी  राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे १ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी तब्बल 703 बैलगाडा मालकांनी नावनोंदणी केली आहे. नियम व अटीचे पालन करत ही शर्यत पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. त्यानंतर लांडेवडी ग्रामस्थांनी शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पहिल्या बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली असून एक जानेवारीला ही शर्यत लांडेवाडी येथील घाटात पार पडणार आहे. त्यासाठी लांडेवाडी गावात बैलगाड्या मालकांची नाव नोंदणी पार पडली. नाव नोंदणीसाठी बैलगाडा मालकांची झुंबड उडाली होती.  लकी ड्रॉ पद्धतीने टोकन काढण्यात आले. या शर्यतीसाठी तब्बल ७०३ बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे नियम व अटीचे पालन करत तसेच कोरोना नियमांचे पालन करत ही शर्यत पार पडणार आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन नियम सांगितले आहेत. दरम्यान लांडेवाडी ...

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 30 डिसेंबर रोजीचा

आंबेगाव तालुक्यात आज दि.30 रोजी 4 गावात 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली. मंचर 3, म्हाळुंगे पडवळ 1, घोडेगाव 1, शिंदेवाडी 1 एकूण असे 6 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या एकूण रुग्ण 22230, आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 21745, आज बरे झालेले 2, मृत 456, तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 29. आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण यांचा आकडा कमी जास्त होत असून नागरिकांनी गाफील राहू नये असे कोरोना बाबत सोशल डिस्टनस, मास्क वापरणे, हात धुणे, गर्दीत जाणे टाळावे, मोठे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड जागेवरच ठार

शिरूर प्रतिनिधी: आंबळे (ता. शिरूर) येथील सोनखिळा वस्ती येथे आज पहाटे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कालवड जागेवरच ठार झाले. नवनाथ दादासाहेब बेंद्रे यांच्या मालकीचा गाईचा गोठा आहे. आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून कालवडवर हल्ला केला. त्यामध्ये कालवड जाग्यावर ठार झाले. यादरम्यान कुत्रे भुंकल्याने बेंद्रे यांना जाग आली घरातून बाहेर येईपर्यंत बिबट्या पळून जात असल्याचे बेंद्रे यांना दिसून आले.  यामध्ये बेंद्रे यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीही बेंद्रे यांच्या तीन पाळीव कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. आज तालुका वनक्षेत्रपाल मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष भुतेकर यांनी पंचनामा केला. शेतकऱ्यांना बिबट्याचे सातत्याने दर्शन होऊ लागल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शिरूर तालुका ग्राहक संघटनेचे संघटक दिलीप बेंद्रे यांनी निवेदनाद्वारे वनविभागाकडे केली.

भावाच्या लग्नाला आल्याने चाकूने केले पत्नीच्या गळ्यावर वार

पुणे प्रतिनिधी: भावाच्या लग्नाला जाण्यास विरोध केला असताना देखील लग्नाला आलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या पतीवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आव्हाळवाडीमध्ये घडला. या प्रकरणी नारायण बाजीराव चव्हाण (वय ३५, रा. मोमीन आखाडा, राहुरी, जि. अहमदनगर) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत अनिल दादाराव जाधव (वय ३०, रा. आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा अनिल जाधव यांचा नारायण चव्हाण हा मेव्हणा आहे. जाधव यांचे लग्न असल्याने चव्हाण याच्या पत्नीला भावाच्या लग्नाला जायचे होते. परंतु, चव्हाण याने पत्नीला लग्नाला जाण्यास विरोध केला. मात्र, तरीही फिर्यादी यांची बहीण लोणीकंद येथे लग्नाला आली. याच कारणावरून चव्हाण याने चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत 19 वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू तर दोंघी गंभीर जखमी

मोरगाव  प्रतिनिधी: मोरगाव (ता . बारामती) येथील तीन महाविद्यालयीन युवतींचा अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात झाला . यामध्ये ऋतुजा दिपक तावरे (वय वर्षे 19) हिचा जागीच मृत्यू तर दुचाकीवरील रुपाली अरुण कौले व अंकीता विष्णु तावरे या गंभीर जखमी झाल्या असुन या तीघीही सुपा येथील विद्या प्रतीष्ठानमध्ये शिकत आहेत. बारामती तालुक्यातील विद्या प्रतीष्ठानच्या महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या प्रथम वर्गात ऋतुजा दीपक तावरे , अंकीता विष्णू तावरे , व रुपाली अरुण कौले या शिकत आहेत . आज दि .29 रोजी महाविद्यालय सुट्टीनंतर आपल्या दुचाकीवरुन सुप्यावरुन मोरगावला येथे येत होत्या . दरम्यान सुपा-मोरगाव या रस्त्यावरील राजबाग पाटी नजीक दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान आल्या असता अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये मोरगाव नजीक शेराचीवस्ती येथील ऋतूजा दिपक तावरे या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अंकीता विष्णु तावरे , रुपाली अरुण कौले या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मोरगाव येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती प्रकरणी गुन्हा दाखल

मंचर प्रतिनिधी: थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केल्याच्या आरोपावरून मंचर पोलिसांनी तुषार तुळशीराम फुटाणे (वय २३, रा. थोरांदळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंचर पोलिसांनी सांगितले की, फुटाणे याने ‘‘आपण दोघे लग्न करू व बाहेर कोठेतरी निघून जाऊ.’’ असे म्हणून तिला मोटर सायकलवर बसवून पळवून चास (ता. खेड) येथील त्याच्या मावशीच्या घरी नेले. तेथे ता. २६ डिसेंबर रोजी तिच्या मनाविरुद्ध संबंध प्रस्थापित केले. याबाबत सदर अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार पुढील तपास करत आहेत.

डिलिव्हरी बॉयची ग्राहकाला दांडक्याने मारहाण

पुणे प्रतिनिधी: अमेझॉन वेबसाइटवरून खरेदी केलेली वस्तू खराब निघाल्यानंतर ती परत घेण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने हुज्जत घालत ग्राहकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.हांडेवाडी येथील ग्रँड एटरीया जी बिल्डींगच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला.  याबाबत अभिजित कदम नावाच्या डिलिव्हरी बॉय विरोधात साकीब शमीन अफरीन (वय ३५, गँड, एटरीया जी. बिल्डींग, हांडेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २५ डिसेंबरला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. रुग्णालयातून मारहाणी बाबतचा वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना लोणावळ्यात अटक

लोणावळा प्रतिनिधी: लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा व विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रशांत शांताराम आंबेकर (रा. देवले, मावळ), अनिकेत अशोक कालेकर (रा. काले, पवनानगर, मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी माहिती दिली. मळवली व देवले परिसरात एक तरुण विनापरवाना पिस्तूल बाळगत संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मळवली देवले रस्त्यावर सापळा रचून प्रशांत आंबेकर याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. पिस्तूलाबाबत विचारले असता त्याने अनिकेत कालेकर याने हे पिस्तूल दिले असल्याची माहिती दिली. दोघांना वडगाव मावळ न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. १) पोलिस कोठडी सुनावली आहे .

अवसरी खुर्द येथून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

प्रतिनिधी मंचर: अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथून राहत्या घरातून रात्रीच्या वेळी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली असल्याची फिर्याद मुलीचे वडील रत्थूलाल मधोसाई सोनी ( वय 51 रा.अवसरी खु।। बैलघाट शेजारी ता आंबेगाव जि पुणे ,मूळ रा. गाव बलगीखार, डगनिया खार मोहल्ला, सोनी पार ता.कटघोरा जि.कोरबा रा.छत्तीसगड ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी त्यांच्या कुटुंबासमवेत  अवसरी खु! येथे कामानिमित्त राहत आहेत. दिनांक 27/12/ 20२१ रोजी फिर्यादी आपली पत्नी व मुली बरोबर घरात झोपले असता रात्री साडेअकराच्या वाजताच्या सुमारास फिर्यादी हे उठले असता त्यांना घरात मुलगी दिपीका दिसली नाही त्यांनी मुलीचा आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तसेच त्यांच्या झोपडी शेजारी राहणारा नितेश महादेव राम ( रा.बिहार हा देखील दिसला नसल्याने त्यांच्या मुलीला नितेश रामने कसले तरी आमिष दाखवून पळून नेल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पो हवा डावखर करत आहे.  मुलीचे वर्णन खालील प्रमाणे नाव दिपीका ...

आळंदी ग्रामिण रूग्णालयात चोरी

आळंदी प्रतिनिधी: आळंदी ग्रामिण रुग्णालयातून नऊ एक्साईड पॉवर प्लस इन्व्हर्टर बॅटऱ्यांची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची तक्रार आळंदी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी आळंदी ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गणपत जाधव यांनी तक्रार आळंदी पोलिस ठाण्यात दिली.  तक्रारीत जाधव यांनी म्हटले की, मार्च महिन्यापासून ग्रामिण रुग्णालयातील इनव्हर्टर बॅटऱ्यांची चोरी होत आहे. सुमारे सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल आजपर्यंत रुग्णालयातून चोरी झाला. शहराच्या मध्यवर्ती आणि पोलिस ठाण्याला लागूनच असलेल्या ग्रामिण रूग्णालयात होत असलेल्या चोरीच्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

जादूटोण्याची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला अटक

पिंपरी प्रतिनिधी: महिलेला अश्लील व्हिडिओ पाठविला. तसेच जादूटोणा करून कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी भोंदूबाबाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (वय ४१, रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी २१ डिसेंबरला वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तिच्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने फोनवरून महिलेला सांगितले. महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्यांचे आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून आरोपीने महिलेला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करू शकरणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. त्यानंतर त्याने स्वत:चा एक अश्लिील व्हीडीओ पाठविला. व्हिडिओमध्ये त्याच्या उजव्या ह...