मार्गासनी प्रतिनिधी:
किल्ले राजगडावर जात असताना एका वयोवृद्ध व्यक्तीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाले असल्याची घटना राजगड गडावर घडली. पांडुरंग पंडित (रा. पाषाण) पुणे यांनी केली पोलिसांत तक्रार दिली. दिलीप महामुनी (वय 60 वर्षाच्या पुढे अंदाजे, रा. पाषाण पुणे) असे या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तावीस नोव्हेंबरला पाषाण येथील पाच जणांचा ग्रुप किल्ले राजगड पाहण्यासाठी या गावी मुक्कामी आला होता. 28 नोव्हेंबरला सकाळी पाच वाजता हा ग्रुप किल्ले राजगड पाहण्यासाठी जात असताना वाटेत महामुनी हे लघुशंकेसाठी गेले. ते लवकर परत न आल्याने त्यांचे मित्र पाहण्यासाठी गेले. त्याठिकाणी महामुनी खाली पडल्याचे दिसून आले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यांना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे जाहीर केले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.