मंचर प्रतिनिधी:
मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एकलहरे (ता. आंबेगाव) येथील मेंढपाळाच्या १४ वर्षीय मुलाला पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन या मुलाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद वडील नामदेव रामा सूळ ( वय 50 मूळ राहणार वडगाव सावता ता. पारनेर जि. अहमदनगर ) यांनी मंचर पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मेंढपाळ नामदेव सूळ हे मेंढपाळ असून कुटूंबासह गेल्या अनेक वर्षांपासून एकलहरे येथे शेतामध्ये राहत आहे. दि. २८/११/२१ रोजी त्यांचा मुलगा खंडू व ते स्वतःहा पुणे-नाशिक रस्ता ओलांडून मेंढ्यांना चारा आणण्यासाठी जात असताना. त्यांचा मुलगा खंडू नामदेव सुळ वय १४ हा सायकल वरून हायवे रस्ता ओलांडत असताना त्याला भरधाव आलेल्या पिकअप गाडी एम. एच १२ एल. टी.४८०९ या वाहनाने धडक दिली. यात चार ते पाच मीटर त्याला फरपटत नेले. पिकअप चालक गाडीसह पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. खंडूला रुग्णवाहिकेत द्वारे ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टर यांनी तपासून तो उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. घटनास्थळी मंचर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. खंडू सुळ याच्या मागे आई, वडील, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात पिकअप चालक विकास रामदास साबळे ( रा.येवलेवाडी कोंढवा बुद्रुक पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार नाडेकर करत आहे.