कल्याण प्रतिनिधी:
डोंबिवलीमध्ये
एक दाम्पत्याने आपल्या पाच दिवसाच्या नवजात बाळाची बेकायदेशीररीत्या एका डॉक्टरला
एक लाखात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी डोंबिवली
रामनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर केतन सोनी आणि दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल
करण्यात आला होता, आता या डॉक्टरचा मोठा प्रताप समोर आला आहे.
मिळालेल्या
माहितीनुसार, १५
नोव्हेंबर रोजी एका जोडप्याने आपले पाच दिवसांचे बाळ विकले होते. परंतु, आई दोन दिवसांनी बाळ परत मागण्यासाठी डॉ. सोनी यांच्याकडे आली पुन्हा आली.
मात्र डॉक्टरांनी त्यांचे बाळ परत देण्यास नकार दिला. त्यानंतर हा सगळा धक्कादायक
प्रकार समोर आला.
या
माहितीच्या आधारे बाल आश्रमावर छापा टाकला आणि 71 मुलांना सोडण्यात आले. धक्कादायक
बाब म्हणजे, संस्थेपासून
हाकेच्या अंतरावर असलेल्या जुन्या इमारतीतील २ ते १३ वयोगटातील ३८ मुलांना एका
खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. जिल्हा आरोग्य संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव यांनी
सांगितलं की, बालकांच्या प्रकृतीची कोणतीही काळजी घेतली नाही
आणि ही सर्व मुले आजारी आहेत अशी माहिती दिली.
कल्याणमध्ये डॉ.केतन सोनी हे नंददीप बालगृह चालवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या पथकाकडून संस्थेची पाहणी करण्यात आली. त्यादरम्यान, २९ बालके उपस्थित असल्याचे आढळून आले आहे. संस्थेची पाहणी केल्यानंतर लहान-मोठ्या मुलींचे कपडे वाळवले जात असल्याचे दिसले. परंतु तिथे मुली राहत नाहीत अशी माहिती देण्यात आली. अधिक संशय आल्याने पोलिसांनी आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या एका जुन्या इमारतीत मुले आहेत हे मान्य केले. अधिक चौकशी करण्यात आली असता, ताब्यात घेण्यात आलेल्या ७१ मुलांची कोणतीही माहिती, कागदपत्रे किंवा साधी नोंदही नाही अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही मुले कुठे आणि कशी वाढली, याबद्दल माहिती उपलब्ध नाही त्यामुळे याचा शोध घेणे सुरु आहे. तर केतन सोनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.