प्रतिनिधि : रामकृष्ण भागवत निमगांव
निमगाव तर्फे म्हाळुंगे ता.जुन्नर येथे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांच्या प्रयत्नातून पुणे जिल्हा परिषदेमार्फत ६५ लक्ष रु. निधीच्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सावरगाव धालेवाडी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे ,युवासेना तालुका प्रमुख विकिभाऊ पारखे , निमगाव चे सरपंच मोहिनीताई घुले ,धामनखेल सरपंच संतोष जाधव ,बस्ती गावचे सरपंच प्रकाशशेठ गिधे ,उपतालुका प्रमुख राजुशेठ चव्हाण ,उपविभागप्रमुख आशिषशेठ हिंगे ,धामनखेल गावचे उपसरपंच अभिभाऊ वर्पे मा, उपसरपंच आर. डी. गोरडे ,माऊली काचळे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पारखे , बस्ती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष जाधव दादा ,निमदारी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आनंदभाऊ भगत , ग्रामसेवक बनसोडे साहेब , ग्रामपंचायत सदस्य दीपालीताई पारखे , शरदभाऊ वाघुले,गणपत नाना घुले,अविनाशभाऊ केदार , मा सरपंच भगवान वाघुले ,गोरडे सर गुलाब गोरडे, नवनाथ जाधव ,मयुरे घुले ,शाखा प्रमुख रोहित घुले ,गव्हर्नमेंट काँट्रॅक्टर प्रतिक घुले , निमगाव आणि धामनखेल ग्रामस्थ उपस्थित होते.